PM Kisan Installment : एकाच घरातील दोन व्यक्तीना पीएम किसानचा हप्ता मिळतो का? नियम काय सांगतात

PM Narednra Modi : एकाच घरातील दोन व्यक्तींना याचा लाभ घेता येतो का नाही याबाबतही काही नवीन नियम लागू केले आहेत.
PM Kisan Installment
PM Kisan Installmentagrowon

Central Government PM Kisan : देशातील शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान योजना सुरू केली. २०१९ साली केंद्राने सुरू केलेल्या योजनेत देशातील कोट्यावधी शेतकरी याचा लाभ घेतात. दरम्यान सरकारने याचाय गैरफायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी काही नियम व अटी लागू केल्या. याचबरोबर एकाच घरातील दोन व्यक्तींना याचा लाभ घेता येतो का नाही याबाबतही काही नवीन नियम लागू केले आहेत.

या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपयांचा आर्थिक लाभ मिळतो. ही रक्कम शेतकऱ्यांना ३ हप्त्यामध्ये वर्षातून विभागून दिली या योजनेसाठी सरकारने अनेक नियमही केले आहे. परंतु, एकाच घरात वडील आणि मुलगा पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात का? अर्ज करत असतील तर एका घरामध्ये वर्षाला बारा हजार मिळू शकतील का? याबाबत जाणून घ्या.

केंद्र सरकारने पीएम किसानच्या १६ हप्ता येत्या २८ फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची घोषणा केली. यासाठी सरकारने शेतकऱ्यांना केवायसी करणे गरजेचे केले आहे. दरम्यान केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पुन्हा पैसे जमा होणार असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या नियमानुसार एकाच घरातील दोन व्यक्तींना पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही. ज्या व्यक्तीच्या नावावर शेती आहे तिच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. सरकारच्या नियमानुसार ज्या व्यक्तीच्या नावावर शेती आहे त्या व्यक्तीला किसान सन्माननिधीसाठी अर्ज करु शकतात. यामध्ये वडिल आणि मुलगा वेगळे राहात असतील आणि त्याच्या स्वत:च्या नावावर वेगवेगळी जमिन असेल त्यांना हा लाभ मिळू शकतो.

PM Kisan Installment
PM Kisan : 'पीएम किसान'चा १६ वा हप्ता कधी येणार ; अखेर मुहूर्त ठरला

पीएम किसान सन्मान निधी योजनेतील कोणताही हप्ता हा सरकारकडे आधार डेटाबेस आहे. ज्यावरुन कुटुंबातील किती लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात हे कळते.

जर तुम्हाला हप्त्याबाबत पाहायचा असेल तर शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या ऑफिशयल वेबासाइटला भेट द्यावी लागेल.

पीएम किसान वेबसाइटवर तुम्हाला पीएम बेनफिट्सचे स्वैच्छिक आत्मसमर्पण पर्याय निवडावा लागेल.

यानंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाइल नंबर टाकावा लागेल. Get OTP वर क्लिक करावा लागेल.

OTP आल्यानंतर सबमिट करुन क्लिक करा.

यानंतर तुम्हाला स्क्रिनवर माहिती मिळेल. आतापर्यंत किती हप्ता मिळाला आहे हे कळेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com