Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : दीड लाख शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास नकार

Kharif Agriculture Loan : यंदाच्या खरीप हंगामात अमरावती जिल्ह्यातील तब्बल दीड लाख शेतकरी पीककर्जापासून वंचित आहेत.

Team Agrowon

Amaravati News : यंदाच्या खरीप हंगामात अमरावती जिल्ह्यातील तब्बल दीड लाख शेतकरी पीककर्जापासून वंचित आहेत. एक एप्रिलपासून प्रारंभ झालेल्या कर्जवाटप प्रक्रियेत आतापर्यंत निर्धारित लक्ष्यांकाच्या तुलनेत साठ टक्के वितरण झाले आहे. ७३ हजार ६३३ शेतकऱ्यांना कर्ज प्राप्त झाले आहे. कर्ज वितरणात नेहमीप्रमाणे राष्ट्रीय व खासगी बॅंकांनी हात आखडता ठेवला आहे.

अमरावती जिल्ह्यासाठी या खरीप हंगामात १६५० कोटी रुपये पीककर्जाचा लक्ष्यांक मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रीय, सार्वजनिक, ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती बॅंक मिळून एकूण २.२५ लाख शेतकऱ्यांना कर्ज विरतणाची मर्यादा निश्चित करण्यात आली. एक एप्रिलपासून खरिपाच्या कर्ज वितरणास प्रारंभ करण्यात आला.

आतापर्यंत राष्ट्रीय बॅंकेने ८७ हजार १०० सभासदांपैकी केवळ २५ हजार ५७७ सभासदांना तर सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांनी १० हजार ४०० पैकी ८९५ सभासदांना कर्जासाठी पात्र ठरवत वितरण केले आहे. ग्रामीण बॅंकेचे २५०० सभासद असून त्यांनी ७७४ सभासदांना कर्ज दिले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने मात्र आघाडी घेत ४६ हजार ३८७ सभासदांना कर्ज वाटप केले आहे. या बॅंकेचे सव्वालाख सभासद आहेत.

यावर्षी पीककर्जाची मर्यादा तीन लाखांवरून पाच लाख करण्यात आली आहे. बॅंक कर्ज वितरण करताना पीकनिहाय कर्ज देत असून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

बॅंकांनी केलेले कर्ज वितरण

खरीप हंगाम २०२५-२६ साठी १६५० कोटींचे लक्ष्यांक निर्धारित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील २ लाख २५ हजार सभासदांना हे कर्ज वितरित करायचे आहे. एक एप्रिलपासून १५ जूनपर्यंत ७३ हजार ६३३ सभासदांना ९८७.७६ कोटी रुपये कर्ज वितरित करण्यात आले आहे. कर्ज वितरणाचे प्रमाण साठ टक्के आहे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Alert Maharashtra : उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता

Soybean Crop Damage : सोयाबीनच्या शेंगा झाडावरच वाळू लागल्या

Mumbai APMC : मुंबई बाजार समितीमध्ये साचले कचऱ्याचे ढीग

Ration Card e-KYC : दोन लाख ८७ हजारांवर लाभार्थी स्वस्त धान्यास मुकण्याची शक्यता

Boragaon Anjanpur Barrage : बोरगाव-अंजनपूर बॅरेजेच्या दुरुस्तीला चौदा कोटी

SCROLL FOR NEXT