APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

APMC In Kolhapur : बाजार समित्यांच्या क्रमवारीत कोल्हापूरच्या १५ बाजार समित्या

APMC Ranking : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पांतर्गत राज्यातील ३०५ बाजार समित्यांची सन २०२३-२४ या वर्षाकरिता वार्षिक क्रमवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Team Agrowon

Kolhapur News : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पांतर्गत राज्यातील ३०५ बाजार समित्यांची सन २०२३-२४ या वर्षाकरिता वार्षिक क्रमवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर विभागातील एकूण २१ बाजार समित्यांपैकी, पंधरा बाजार समित्या राज्यातील पाहिल्या १०० क्रमवारीमध्ये आल्या आहेत.

कोल्हापूर विभागातील आटपाडी बाजार समिती कोल्हापूर विभागांमध्ये प्रथम क्रमांकावर असून, फलटण बाजार समिती द्वितीय व लोणंद बाजार समिती तिसऱ्या क्रमांकावर आहे. आटपाडी बाजार समिती राज्यस्तरावर २२ व्या क्रमांकावर असून फलटण बाजार समिती २४ तर लोणंद बाजार समिती २९ व्या क्रमांकावर आहे.

यामध्ये बाजार समितीकडे उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा व इतर सुविधा याकरिता ८० गुण, बाजार समितीचे आर्थिक निकष याकरिता ३५ गुण, बाजार समितीचे वैधानिक कामकाज याकरिता ५५ गुण, इतर विशेष निकषाकरिता ३० गुण देण्यात आले होते.

एकूण २०० गुणांपैकी मिळालेल्या गुणांच्या आधारे बाजार समित्यांची राज्यस्तरीय क्रमवारी देण्यात आली आहे. राज्याच्या पणन संचालनालयाकडून स्मार्ट प्रकल्पांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी कक्ष यांच्याकडून राज्यस्तरीय क्रमवारी घोषित करण्यात आली आहे.

राज्यस्तरीय क्रमवारीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल कोणत्या बाजार समितीमध्ये विक्री करावा याचा विचार करून शेतकरी आपला शेतीमाल संबंधित बाजार समितीमध्ये पाठवू शकतात. बाजार समितीच्या आवारामध्ये शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी यांच्यासाठी उपलब्ध असणाऱ्या सुविधा तसेच बाजार समितीचे आर्थिक व्यवहार, त्याचप्रमाणे कृषी पणन कायद्यानुसार बाजार समितीमध्ये चालणारे कामकाज, या विविध बाबींचा विचार करून ही क्रमवारी देण्यात आलेली आहे.

यामध्ये आटपाडीसारखी तालुका स्तरावरील बाजार समिती शेतकऱ्यांसाठी राबवीत असलेल्या विविध योजना, व्यापाऱ्यांसाठी असणाऱ्या सोयी सुविधा या अतिशय चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून दिल्या आहेत. शासनाच्या विविध योजनांतर्गत शेतकऱ्यांसाठी व बाजार आवारातील विविध घटकांसाठी सर्वाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न बाजार समितीने केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: काकडीला उठाव कायम; सोयाबीनमध्ये घट, कापसात चढ उतार, गव्हाचा भाव स्थिर, केळीला उठाव

Papaya Cultivation Completed: खानदेशात पपई लागवड पूर्ण; जळगावात क्षेत्रवाढ

Onion Prices Issue: कमी दरांमुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT