Jalyukta Shivar Agrowon
ॲग्रो विशेष

Jalyukta Shiwar : सांगलीतील १४७ गावांचा ‘जलयुक्त शिवार’मध्ये समावेश

Jalyukta Shivar Abhiyan : जलयुक्त शिवार अभियान टप्पा २ मध्ये जिल्ह्यातील १४७ गावांचा समावेश करण्यात आला आहे.

Team Agrowon

Jalyukta Shiwar Sangli News : जलयुक्त शिवार अभियान टप्पा २ मध्ये जिल्ह्यातील १४७ गावांचा समावेश करण्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियानातील कामे निश्चित करून ती सुरू करण्यासाठी संबंधित गावांत शिवार फेरी सुरू करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या.

जलयुक्त शिवार अभियान टप्पा २ व गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा जलसंधारण अधिकारी धनंजय साहुत्रे, वरिष्ठ भूवैज्ञानिक जयंत मिसाळ यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ. राजा दयानिधी म्हणाले, की जलयुक्त शिवारमधील कामांसाठी शिवार फेरी आवश्यक असून कृषी विभागाची जबाबदारी महत्त्वाची आहे. ग्रामसेवक, कृषी सहायक, जलसुरक्षा रक्षक, शेतकरी, ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचाच्या अध्यक्षतेखाली कामे करावीत. जलयुक्त शिवार अभियानात करण्यात येणारी कामे शिवार फेरीच्या माध्यमातून निश्चित अहवाल ३१ मेपर्यंत जिल्हास्तरीय समितीकडे सादर करावा.

अमृत सरोवर योजनेत ७६ कामे

मिशन अमृत सरोवर योजनेचाही आढावा या वेळी घेण्यात आला. जिल्ह्यात अमृत सरोवर योजनेतून ७६ कामे होणार असून, यापैकी ३१ कामे पूर्ण झाली आहेत.‍ उर्वरित प्रगतिपथावर असलेली कामे ३१ मे २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे यंत्रणांनी नियोजन करावे, अशा सूचना डॉ. दयानिधी यांनी दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain: काही भागात हलक्या पावसाची शक्यता; राज्यातील बहुतांशी भागात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज

Kharif Sowing: बुलडाणा जिल्ह्यात खरीप पेरणीला वेग

Farm Roads Issue: माजलगावच्या २०५ किलोमीटर शेतीपोच रस्त्यांची दुरवस्था

Dairy Farming Training: पशुपालन, दुग्धव्यवसाय व्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी ४२ शेतकरी गुजरातला रवाना

Agricultural Land: शेतजमीनधारकांना मोठा दिलासा! शर्तभंग नियमित करण्याबाबत महसूल विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT