Ladki Bahin Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Ladki Bahin Scheme: लाडकी बहिणमध्ये १४ हजार पुरुषांना लाभ; अजित पवारांचा कारवाईचा इशारा

Women Welfare: पुण्यात आज (ता.२६) अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी उत्सवात माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहिण योजनेतील गैरप्रकारांवर कठोर कारवाईचा इशारा दिला.

Sainath Jadhav

Pune News: पुण्यात आज (ता.२६) अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी उत्सवात माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहिण योजनेतील गैरप्रकारांवर कठोर कारवाईचा इशारा दिला. या योजनेत १४ हजार पुरुषांनी अवैधरित्या लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.अपात्र लाभार्थ्यांची नावे काढून त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातील, असे पवार यांनी स्पष्ट केले.दरम्यान लाडकी बहिण योजनेचा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हफ्ता रक्षाबंधनच्या वेळेस मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लाडकी बहिण योजनेतून महिलांना आर्थिक साहाय्य देण्याचा शासनाचा उद्देश आहे. मात्र, या योजनेत पुरुषांनी बनावट नावे वापरून पैसे लाटल्याचे उघड झाले आहे. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “ही योजना फक्त महिलांसाठी आहे.

पुरुषांनी यात नावे घुसवून पैसे घेतले असतील, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल. त्यांच्याकडून घेतलेली रक्कमही वसूल केली जाईल.” तसेच, योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची नावे यादीतून काढून टाकण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.या योजनेतील गैरव्यवहार उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

अजित पवार यांनी सांगितले की, या महिन्याचे लाडकी बहिण योजनेचे पैसे वितरित करण्यात आले आहेत. “ही योजना चांगल्या हेतूने सुरू करण्यात आली होती. मात्र, काही चुकीच्या नोंदींमुळे पुरुषांची नावे यात समाविष्ट झाली असावीत. ही चूक सुधारली जाईल,” असेही ते म्हणाले.

जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हफ्ता रक्षाबंधनला मिळणार

लाडकी बहिण योजनेचा पुढील जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हफ्ता रक्षाबंधनच्या वेळेस मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.याआधी २०२४ मध्ये देखील दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र देण्यात आले होते. त्यामुळे यंदाही रक्षाबंधनपूर्वी, म्हणजेच ९ ऑगस्टपूर्वी, एकूण ३ हजार रुपये मिळण्याची अपेक्षा लाडक्या बहिणींकडून व्यक्त होत आहे.“मुख्यमंत्री   माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण १२ हफ्ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले गेले आहेत.

यावेळी अजित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबतही भाष्य केले. “मी यापूर्वीही कोकाटे यांच्याबाबत बोललो आहे. लवकरच त्यांच्याशी चर्चा करून आणि राज्याच्या प्रमुखांशी सल्लामसलत करून याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल,” असे त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Lifestyle: आदिवासींची निसर्गपूरक शेती अन् जीवनशैली

Farmer Safety: विविध दंश, विषबाधेपासून स्वसंरक्षणाच्या उपाययोजना

Maharashtra’s Grape Industry: जागतिक ‘व्हिजन’ ठेवून द्राक्ष उद्योगाची वाटचाल

Weekly Weather: राज्यात चांगल्या पावसाची शक्यता

Parbhani Cooperative Fraud: परभणीच्या तब्बल ४२ संस्थांची नोंदणी रद्द

SCROLL FOR NEXT