Rain Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Crop Damage : अवकाळी पावसामुळे सहा हजार हेक्टर क्षेत्र बाधित

Heavy Rain Crop Loss : मे महिन्यातील अवकाळी पावसाने फळपिकांसोबत बागायती क्षेत्रावरील पिकेही आडवी झाली होती. सततच्या पावसामुळे सहा हजार ९० हेक्टवरील रब्बी ज्वारी, गहू, भूईमुगासह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.

Team Agrowon

Latur News : जिल्ह्यात मेमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा १३ हजार ६९० शेतकऱ्यांना फटका बसला असून या शेतकऱ्यांच्या तब्बल सहा हजार ३१२ हेक्टर क्षेत्रावरील पिके व फळबागा बाधित झाल्या आहेत. यात सहा हजार ९० हेक्टरवरील रब्बी पिके व भाजीपाला पिके तर २२१ हेक्टवरील फळबागांचा समावेश आहे.

बाधित क्षेत्रावरील ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) नियमानुसार या शेतकऱ्यांना १७ कोटी २४ लाख २२ हजार ९० रुपये नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे निधीची मागणी केली आहे.

मे महिन्यातील अवकाळी पावसाने फळपिकांसोबत बागायती क्षेत्रावरील पिकेही आडवी झाली होती. सततच्या पावसामुळे सहा हजार ९० हेक्टवरील रब्बी ज्वारी, गहू, भूईमुगासह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. यासोबत फळबागांनाही या पावसाचा मोठा फटका बसला. यात २२१ हेक्टवरील केळी, द्राक्ष, पपई, डाळिंब, मोसंबी, आंबा, चिकू, संत्रा व अन्य फळांचे नुकसान झाले.

या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्यानुसार महसूल व कृषी विभागाने पंचनामे करुन नुकसानीचा अहवाल सादर केला होता. यात तीन हेक्टरपर्यंतची नुकसान भरपाई मिळत असली तरी सर्वच शेतकऱ्यांचे दोन हेक्टरपर्यंतच नुकसान झाले आहे. त्यानुसार भरपाई देण्यासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे.

पावसामुळे लातूर तालुक्यातील एका गावात जमिनीचेही नुकसान झाले असून त्याच्या भरपाईसाठी २५ हजार ८५० रुपये निधीची मागणी प्रशासनाने केली आहे. सर्वाधिक सतराशे हेक्टरवरील पिके व फळबागांचे नुकसान अहमदपूर तालुक्यात झाले असून या तालुक्यातील शेतकऱ्यांना चार कोटी ६२ लाखाची भरपाई मिळण्याची शक्यता आहे.

त्यानंतर उदगीर तालुक्यातील बाराशे हेक्टर, औसा तालुक्यातील ७१० हेक्टर, निलंगा तालुक्यातील ६७९ हेक्टरवरील पिके व फळबागांना अवकाळी पावसाची बाधा झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Crisis: अतिवृष्टी, महापुरात शेतकरी उघड्यावर

Agriculture Livestock Scheme: गाई-म्हशीसाठी ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान; शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी सरकारची योजना

Water Management: धरण व्यवस्थापन संहिता

Rain Crop Damage: सांगली जिल्ह्यातील सात हजार एकरांवरील पिके पाण्यात

Maharashtra Agricultural Council: कृषी परिषदेला मिळेना पूर्णवेळ संचालक

SCROLL FOR NEXT