Marathwada Water storage  Agrowon
ॲग्रो विशेष

Marathawada Water Storage : मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पात १३१ टीएमसी पाणी

Dam Water Storage : जोरदार पावसामुळे पाणीसाठा वाढण्याची आशा

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Marathawada Water : छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांमधील एकूण पाणीसाठा १३१.९४ टीएमसीवर पोहोचला आहे. या पाणी साठ्यामध्ये ७१.८५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे. एकूण ११ प्रकल्पांपैकी सीना कोळेगाव व माजलगाव हे दोन्ही प्रकल्प अजूनही मृतसाठ्यातच आहेत. दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठ्यांमध्ये वाढ होणे सुरू झाले आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने जोर पकडल्याने मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील पावसाची तूट भरून निघण्याची आशा निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पात आताच्या घडीला ५३.८५० टीएमसी एकूण पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामध्ये २७.७९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे. निम्न दुधना प्रकल्पातील एकूण पाणीसाठा ४.९३२ टीएमसीवर पोहोचला असून त्यामध्ये १.३१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. येलदरी प्रकल्पात १४.९९० टीएमसी एकूण पाणीसाठा झाला असून त्यामध्ये १०.५९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे.

सिद्धेश्वर प्रकल्पात एकूण ७.९२९ टीएमसी पाणीसाठा झाला असून त्यामध्ये १.९३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे. माजलगाव प्रकल्पात ४.२७३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हा प्रकल्प मात्र मृतसाठातच असून त्यामध्ये पाण्याची आवक वाढली तरच तो मृतसाठ्यातून बाहेर पडू शकतो. मांजरा प्रकल्पात ३.०४६ टीएमसी पाणीसाठा झाला असून त्यापैकी १.३८ उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे. पैनगंगा प्रकल्पात एकूण ३१.८८६ टीएमसी पाणीसाठा झाला असून त्यामध्ये २०.७६ टीएमसी उपयुक्त पाण्याचा समावेश आहे. मानार प्रकल्पात ४.९५२ टीएमसी पाणीसाठा झाला असून त्यामध्ये ४.६४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे.

निम्न तेरणा प्रकल्पात २.०६३ टीएमसी एकूण पाणीसाठा झाला असून त्यापैकी १.०१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. विष्णुपुरी प्रकल्पात २.५३९ टीएमसी पाणीसाठा झाला असून त्यापैकी २.४४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. सीनाकोळेगाव प्रकल्पाची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता ३.१५५ टीएमसी असून प्रकल्पात आत्ताच्या घडीला १.४८४ टीएमसीच पाणीसाठा झाल्याने हा प्रकल्प ही मृतसाठ्यातच आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parliament Winter Session 2024 : आज संसदेचे हिवाळी अधिवेशन; अदानी प्रकरण आणि वक्फ विधेयकामुळे तापमान वाढणार?

Onion Crop : आळेफाटा परिसरात कांदा पीक फुलोऱ्यात

Livestock Market : आळेफाटा येथे गाईंच्या बाजारात ५४ लाखांची उलाढाल

Climate Change Conference : विकसित राष्ट्रांना ३०० अब्ज डॉलर्स मिळणार

Cotton Market : वरोरा भागात कापसाला ७१५० रुपयांचा दर

SCROLL FOR NEXT