Marathawada Water Project : मराठवाड्यातील ८० लघू-मध्यम प्रकल्प अजूनही कोरडे

Irrigation Project : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा २८ जुलै अखेर ३२ टक्क्यावर आला आहे. २१ जुलै अखेर हा पाणीसाठा २७ टक्के इतका होता.
Water Project
Water ProjectAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा २८ जुलै अखेर ३२ टक्क्यावर आला आहे. २१ जुलै अखेर हा पाणीसाठा २७ टक्के इतका होता. दुसरीकडे अजूनही अपेक्षित पाऊस पडत नसल्याने मराठवाड्यातील ७९ लघू व एक मध्यम प्रकल्प अजूनही कोरडा आहे. सार्वजनिकरित्या दमदार व जोरदार पाऊस होत नसल्याने पाणीसाठ्यांची स्थिती अपेक्षेनुसार सुधारत नसल्याची स्थिती आहे.

अजूनही कोरड्या असलेल्या लघू प्रकल्पांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ७, बीडमधील ३५, लातूरमधील ३, धाराशिवमधील ३४ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. जवळपास ३२४ लघू प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली आहे.

Water Project
Khandesh Water Project : खानदेशातील सिंचन प्रकल्प कोरडेच

जोत्याखाली पाणीसाठा गेलेल्या लघू प्रकल्पामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ४७, जालनामधील ४५, बीडमधील ५७, लातूरमधील ५६, धाराशिवमधील १०२, नांदेडमधील ७ व परभणीतील १० लघू प्रकल्पांचा समावेश आहे .२०४ लघू प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असून, ५३ लघू प्रकल्पात २५ ते ५० टक्के, २१ लघू प्रकल्पात ५० ते ७५ टक्के तर केवळ ३१ लघू प्रकल्पात ७५ टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा आहे .

Water Project
Dara Water Project : दरा मध्यम प्रकल्पाच्या पाणीपातळीत वाढ

२० मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली असून त्यामध्ये छत्रपती संभाजी नगरमधील ४, जालन्यातील १, बीडमधील ६, लातूरमधील २, धाराशिवमधील ६ व नांदेडमधील एका प्रकल्पाचा समावेश आहे. जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या २० मध्यम प्रकल्पांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ४, जालन्यातील एक, बीडमधील सहा, लातूरमधील दोन, धाराशिवमधील सहा व नांदेडमधील एका प्रकल्पाचा समावेश असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्यावतीने देण्यात आली.

प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी

प्रकल्प प्रकार संख्या टक्केवारी

मोठे प्रकल्प ११ ३५.२२

मध्यम प्रकल्प ७५ १८.९

लघू प्रकल्प

गोदावरी ७४९ ९.५६

नदीवरील बंधारे

तेरणा, मांजरा, रेना १५ ३२.४६

नदीवरील बंधारे २७ २१.९५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com