Gharkul Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Gharkul Scheme : परभणीत १३ हजार ४६२ घरकुलांना मंजुरी

Modi Awas Yojana : मोदी आवास घरकुल योजनेत परभणी जिल्ह्याला एकूण १३ हजार ५९६ एवढे घरकुल मंजुरीसाठी उद्दिष्ट देण्यात आले.

Team Agrowon

Parbhani News : मोदी आवास घरकुल योजनेत परभणी जिल्ह्याला एकूण १३ हजार ५९६ एवढे घरकुल मंजुरीसाठी उद्दिष्ट देण्यात आले. त्यापैकी जिल्ह्यात एकूण १३ हजार ४६२ एवढ्या घरकुलांचे मंजुरी देण्यात आली असून एकूण ९९.०१ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

मोदी आवास योजनेतील उद्दिष्टात परभणी तालुक्यात २ हजार ३५७ घरकुल, जिंतूरमध्ये ३ हजार ५९९ घरकुल, सेलू तालुक्यात १ हजार ४६२ घरकुल, मानवत तालुक्यात ६२४ घरकुल, पाथरी तालुक्यात ९४५ घरकुल, सोनपेठ तालुक्यात ८६१ घरकुल, गंगाखेड तालुक्यात १ हजार ३४३, पालम तालुक्यात १ हजार ३१०, पूर्णा तालुक्यातील १ हजार ९५ घरकुलांचा समावेश आहे.

त्यापैकी ७ हजार १९१ एवढे खाते क्रमांकांची पडताळणी करण्यात आली. ५९०१ पैकी ५ हजार ७९३ एवढ्या लाभार्थ्यांचे एफटीओ जनरेट करण्यात आले आहेत. शासनाच्या नवीन शासन निर्णयानुसार विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार, असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर यांनी दिली आहे.

राज्यात इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्यात आली होती. याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम देखील देण्यात आला होता. याच कार्यक्रमात ता ३० जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या शासन निर्णयात विमुक्त जाती व भटक्या जमातींचा समावेश करण्यात आला आहे.

सदर प्रवर्गास ता. २८जुलै २०२३ रोजीच्या शासन निर्णयातील अटी व शर्ती लागू असतील. या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत व पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Article: माचीवरला शंकर...

Saptashrungi Devi Darshan: सप्तशृंगीमातेचे मध्यरात्रीपर्यंत मिळणार दर्शन

Model Village: भेंड गावानं बांधलं प्रगतीचं, विकासाचं तोरण !

Agrowon Diwali Article: अवघाचि संसार सुखाचा करीन

NITI Aayog: देशातील समुद्री मासेमारीच्या विकासासाठी नीती आयोगाचा अहवाल; स्वतंत्र योजना आणि धोरणांची शिफारस

SCROLL FOR NEXT