Election Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Marketing Federation Election : राज्यात कापूस पणन महासंघाचे १३ संचालक बिनविरोध

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या निवडणुकीत १७ पैकी १३ संचालकांविरोधात कोणी लढण्यासाठीच तयार नसल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उर्वरित चार संचालकांच्या निवडीसाठी रविवारी (ता. ७) मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मंगळवारी (ता. ९) मतमाजेणी होणार आहे. त्यानंतर पणन महासंघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड होणार असल्याचे पणन महासंघाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

कापूस फेडरेशनशी संलग्नीत जिनिंग, खरेदी-विक्री संस्थांचे प्रतिनिधी यांना या निवडणुकीत मतदानाचा अधिकार आहे. दोन महिला, एक एनटी, एक ओबीसी, एक एससीएसटी त्यासोबतच राज्यातील सुतगिरणी संस्थांचा प्रतिनिधी म्हणून पणन महासंघावर प्रतिनिधित्वासाठी पात्र ठरतात. पणन महासंघासाठी १७ संचालकांची निवडणूक प्रक्रिया होते. राज्यात त्यानुसार ११ झोन निश्‍चित करण्यात आले आहेत.

या झोनमधून १७ पैकी तब्बल १३ संचालक बिनविरोध निवडण्यात आले. त्यामध्ये अमरावती झोनमधून अनंतराव देशमख, शिरीश धोत्रे (अकोला), प्रफुल्ल मानकर, सुरेश चिंचोळकर (यवतमाळ), संजय पवार (जळगाव), उषा शिंदे (नाशिक), संगीता अळसपुरे, शिवाजी दशपुते (छत्रपती संभाजीनगर), पंडीत चौखट (परभणी), विष्णुपंत सोळंके, राजकिशोर मोदी (परळी वैजनाथ) यांचा समावेश आहे.

सुतगिरणी संस्थांचे प्रतिनिधी म्हणून कुणाल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तब्बल १३ संचालक बिनविरोध ठरल्यानंतर केवळ चार झोनमध्ये रविवारी (ता. ७) निवडणूक प्रक्रिया झाली. वर्धा-नागपूर झोन, वणी झोन, नांदेड झोन तसेच इतर मागास प्रवर्गातील एका संचालकाच्या निवडीकरिता मतदान झाले. मंगळवारी (ता. ८) मतमोजणी होणार असून विजयी उमेदवाराची घोषणा होईल.

अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी दावेदारी

पणन महासंघात काँग्रेसचा दबदबा आहे. त्यामुळेच अध्यक्षपद हे काँग्रेसलाच मिळेल. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आहे. सध्या अमरावती येथील अनंतराव देशमुख हे अध्यक्ष आहेत. त्यांनी पणन महासंघाला वलय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. अभ्यासू व्यक्‍तिमत्त्व म्हणूनदेखील ते ओळखले जातात. दरम्यान, संचालकांच्या निवडणुकीनंतर सात दिवसपूर्व नोटीस देत अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT