Wanrai Bunds  Agrowon
ॲग्रो विशेष

Wanrai Bunds : पुणे जिल्ह्यात आतापर्यंत बांधले १२०० वनराई बंधारे

Water Conservation : जिल्ह्यातील विविध विभागांमार्फत आतापर्यंत १ हजार २०० वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

Team Agrowon

Pune News : पावसाची अनियमितता आणि त्यातील खंड यामुळे काही तालुक्यांत पाणीटंचाईला सामारे जावे लागत आहे. वनराई बंधारे बांधण्याची मोहीम कृषी, जिल्हा परिषद, महसुलसह अन्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध विभागांमार्फत आतापर्यंत १ हजार २०० वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात १० हजार वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. बंधारे बांधण्यास ८ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. या मोहिमेत अधिकारी, कर्मचारी, शाळा, महाविद्यालये, सेवाभावी संस्था, व्यापारी मंडळे, गणेश मंडळे, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी सेवा केंद्र, लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य घेण्यात येत आहे.

वनराई बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग पिण्याच्या पाण्याकरिता, जनावरांना, भाजीपाला आणि कडधान्य यांसारख्या पिकांसाठी होतो. सिमेंटच्या रिकाम्या गोण्यामध्ये रेती, वाळू भरून आणि त्यांची तोंडे शिवून बंधाऱ्यासाठी वापरता येतात.

जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे टंचाई परिस्थिती निर्माण झाली असून, सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यात ११ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. काही गावांत पावसाचे प्रमाण चांगले असूनही पाणी साठवणूक न झाल्याने टंचाईची परिस्थिती निर्माण होते. बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी अडविले जाऊन भूजल पातळीत वाढ होऊन सक्षम जलस्रोतांची निर्मिती होते.

कमी पर्जन्यमान असलेल्या भागात पावसाच्या पाण्याचा पुरेपूर उपयोग अशा बंधाऱ्यांमुळे करता येतो. गावातील पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी होऊन पशुधनालाही या पाण्याचा उपयोग होतो. बंधाऱ्यांची साखळी निर्माण केल्यास विहिरीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

...असे बांधावे वनराई बंधारे

- बंधाऱ्यासाठी जागा निवडताना कमीत कमी खर्चात, जास्तीत जास्त पाण्याचा साठा करणे शक्य होईल अशी जागा निवडावी.

- नाला अरुंद व खोल असावा तसेच साठवण क्षमता पुरेशी असावी.

- नाल्याच्या तळाचा उतार ३ टक्क्यांपेक्षा कमी असावा.

- बंधाऱ्याची उंची जास्तीत जास्त १.२० मीटर एवढी असावी.

- निवडलेली जागा प्रवाहाच्या वळणाजवळची असू नये.

- वनराई बंधाऱ्याचे बांधकाम करताना प्रवाहाचा उतार व रुंदी लक्षात घेऊन बंधाऱ्याच्या पायथ्याची रुंदी १.५ ते २.५ मीटर असावी.

- हा बंधारा दोन्ही काठांपर्यंत बांधावा.

- सिमेंटच्या रिकाम्या गोण्यामध्ये रेती, वाळू भरून त्यांची तोंडे प्लॅस्टिकच्या दोऱ्यांनी शिवून बंधाऱ्यासाठी वापरण्यात यावेत.

- प्रवाहाच्या वाहण्याच्या दिशेस आडवा अशी बंधाऱ्याची रचना असावी.

- पहिला थर तयार झाल्यावर तसाच दुसरा थर रचण्यात यावा. विटांची भिंत बांधताना वापरण्यात येणारी सांधेजोड पद्धत यात वापरण्यात यावी.

- साधारणत: दोन अथवा तीन थरानंतर मातीचा थर पसरविण्यात यावा, त्यामुळे रचलेल्या पोत्यांच्या मधील फटी बुजून बंधाऱ्यांचे सांधे पक्के होतात व पाणी झिरपत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

Election Results Maharashtra 2024 : महाराष्ट्रावर महायुतीचेच राज्य

Pune Assembly Election Result : पुणे जिल्ह्यात महायुतीच !

Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

SCROLL FOR NEXT