Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Crop Insurance : खरीप पीकविमा योजनेत १२ लाख ४६ हजारांवर अर्ज

Team Agrowon

Parbhani News : यंदाच्या २०२४ खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत शेतकरी सहभागातील प्राथमिक आकडेवारीनुसार परभणी जिल्ह्यातील ५२ महसूल मंडलांतील ३ लाख ५७ हजार २८६ शेतकऱ्यांनी ७ लाख ६३ हजार २२८ अर्ज दाखल केले असून ५ लाख २३ हजार ९६० हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडलांतील २ लाख ९ हजार ३४९ शेतकऱ्यांनी ४ लाख ७८ हजार ४८६ अर्ज दाखल करत ३ लाख १८ हजार ४८० हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे.

परभणी जिल्ह्यात पीकविमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांमध्ये कर्जदारांचे ६ हजार ५७० व बिगर कर्जदारांचे ७ लाख ५६ हजार ६५८ अर्ज मिळून एकूण ७ लाख ६३ हजार २२८ विमा अर्ज आहेत. त्यात सीमांत शेतकऱ्यांचे ७.४७ टक्के, लहान शेतकऱ्यांचे ८९.०२ टक्के तसेच इतर ३.५१ टक्के तर महिला शेतकऱ्यांचे २२.५७ टक्के व पुरुष शेतकऱ्यांचे ७७.४१ टक्के इतर ०.००२ टक्के अर्ज आहेत.

एकूण ५ लाख २३ हजार ९६० हेक्टरवरील पिकांसाठी २ हजार ७७२ कोटी ११ लाख ५७ हजार रुपये एवढ्या विमा रकमेचे संरक्षण घेतले आहे. शेतकऱ्यांनी प्रतिअर्ज १ रुपयानुसार ७ लाख ६३ हजारांवर विमा हप्ता भरला आहे. राज्य व केंद्र शासनाचा मिळून एकूण ७८२ कोटी ६९ लाख रुपये विमा हप्ता आहे. हिंगोली जिल्ह्यात कर्जदारांचे ७ हजार ७४४ व बिगर कर्जदारांचे ४ लाख ७० हजार ७४२ अर्ज मिळून एकूण ४ लाख ७८ हजार ४८६ विमा अर्ज आहेत.

परभणी, हिंगोली जिल्हा पीकविमा स्थिती क्षेत्र हेक्टरमध्ये

तालुका मंडले शेतकरी संख्या विमा

अर्ज विमा

संरक्षित क्षेत्र

परभणी ९ ६०८३७ १०५७२३ ८८०६५

जिंतूर ८ ५७८२० १४६२६० ८८३०३

सेलू ६ ४०५०० ९०१६८ ५८०८७

मानवत ५ २८०१७ ४८५९३ ४१०१३

पाथरी ४ ३२४५६ ६००४८ ४६०९३

सोनपेठ ४ २५३१७ ५१५३३ ४६०१४

गंगाखेड ५ ४००५८ ९८९१५ ५७२४५

पालम ५ ३३२१२ ८२४०८ ४६९९०

पूर्णा ६ ४२३४९ ७९५८० ५२१४४

हिंगोली ६ ३८३७९ ८९०६७ ६३७६५

कळमनुरी ६ ४३४१७ ८३१९० ६६९१३

वसमत ७ ४८६१० १०४०९६ ६२६२६

औंढा नागनाथ ४ ३५७२५ ८९७७० ५०४७५

सेनगाव ६ ४५६४० ११२३६३ ७४६९४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कापसात चढ उतार सुरु; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत केळी दर

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात ऊस लागवडीला गती नाहीच

Crop Loan : नाशिक जिल्हा बँकेकडून ६०० कोटींवर पीककर्ज

Agriculture Electricity : कृषिपंपांच्या वीज संयोजनाचा प्रश्‍न कायम

Crop Loan : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाकडे राष्ट्रीय, खासगी बॅंकाचा काणाडोळा

SCROLL FOR NEXT