Tourism Development Agrowon
ॲग्रो विशेष

UNESCO Heritage List: शिवकालीन १२ किल्ल्यांना जागतिक ओळख – युनेस्कोला अंतिम सादरीकरण!

Shivaji Maharaj Fort: छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी पॅरिसमध्ये अंतिम सादरीकरण केले. यामुळे महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाला जागतिक मान्यता मिळण्याची मोठी संधी आहे.

गणेश कोरे

Pune News: ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासाठी सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांना पॅरिस येथे युनेस्कोच्या दालनात युनेस्कोच्या सांस्कृतिक विभागाचे सहायक महासंचालक अर्नेस्टो ओटोन रामिरेझ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली किल्ल्यांचे सादरीकरण केले.

राज्यातील १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासाठी तत्कालीन सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी प्रस्ताव सादरीकरणाच्या हालचाली सुरू केल्या होत्या. यानंतर विविध टप्प्यांवर प्रस्ताव तयार होऊन, युनेस्कोते अधिकारी हाउसिंग लि. यांनी २९ सप्टेंबर २०२४ रोजी शिवनेरी, नाणेघाटासह राज्यातील १२ किल्ल्यांना प्रत्यक्ष भेटून प्रस्ताव युनेस्कोला पाठविला होता.

यानंतर आता अंतिम सादरीकरणासाठी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासह अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद श्रीमती शिखा जैन पॅरिस दौऱ्यावर आहेत. शिष्टमंडळाने नुकताच युनेस्कोच्या सांस्कृतिक विभागाचे सहायक महासंचालक अर्नेस्टो ओटोन रामिरेझ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळण्यास मदत होईल आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारशाचे महत्त्व अधोरेखित होईल. त्याचबरोबरीने युनेस्कोचा ‘जागतिक वारसा दर्जा’ या किल्ल्यांना प्राप्त झाला तर या किल्ल्यांचे जतन, संवर्धन होईल आणि पर्यटन विकासासाठी अधिक संधी उपलब्ध होतील. ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्‍वास मंत्री शेलार यांनी व्यक्त केला.

...हे आहेत किल्ले

साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, स्वर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, जिंजी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Certificate Registration: महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी १२ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त, कृषिमंत्र्यांची माहिती

Ujni Dam Water : उजनीत पाणीसाठा मुबलक; तरी मासे घटले!

Agriculture Subsidy: कोल्हापुरात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या ४६४ लाभार्थ्यांना अनुदान

Okra Pest Attack: भेंडीवरील मावा, तुडतुडे आणि पांढरी माशीचे नियंत्रण

E-Pik Pahani : पीक पाहणीसाठी पैसे; गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT