Jal Jivan Mission Agrowon
ॲग्रो विशेष

Jal Jivan Mission : ऐन टंचाईत ‘जलजीवन’ची ११५३ कामे अर्धवटच

Water Shortage : ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणी शुद्धीकरण यंत्रणा नसल्याचे सरकारकडून करण्यात आलेल्या सर्व्हेतून पुढे आले. उपलब्ध असलेलेच पाणी त्यावर प्रक्रिया करून लोकांना पिण्यास देण्यात येते.

हेमंत पवार

Karad News : प्रत्येकाला स्वच्छ आणि शुद्ध पाणी पिण्यास मिळणे हा अधिकार आहे. त्याअंतर्गत प्रत्येक कुटुंबापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पाणी देण्यासाठीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत सातारा जिल्ह्यात एक हजार ५५६ कामांना मंजुरी मिळाली. मात्र त्यातील अजूनही एक हजार १५३ कामे सुरूच आहेत. तर फक्त ४०३ कामे पूर्ण झाली आहेत.

मंजूरपैकी अजूनही १०२ कामे सुरूच झालेली नाहीत. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या पाणीटंचाईच्या काळातच ही कामे मुदत संपत आली तरीही अर्धवट स्थितीत राहिली आहेत. त्यामुळे अनेकांना त्या पाणी योजनेच्या पाण्यापासून वंचितच राहावे लागणार आहे. अजूनही ही कामे पूर्ण होण्यासाठी सहा महिन्यांची वाट पाहावी लागणार असल्याची चिन्हे आहेत.

आरोग्यासाठी मोहीम

ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणी शुद्धीकरण यंत्रणा नसल्याचे सरकारकडून करण्यात आलेल्या सर्व्हेतून पुढे आले. उपलब्ध असलेलेच पाणी त्यावर प्रक्रिया करून लोकांना पिण्यास देण्यात येते. त्या पाण्याच्या पाइपलाइनमध्ये अनेकदा सांडपाणीही मिसळून साथीचे आजार पसरल्याच्या घटना घडल्या आहेत.

त्यातून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. या सर्वाला फाटा देऊन प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यासाठीची मोहीम केंद्र सरकारने जलजीवन मिशन अंतर्गत हाती घेतली आहे. त्याद्वारे लोकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करून लोकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

योजनांना मुदतवाढ देण्याची वेळ

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला मार्च २०२४ पर्यंत सर्व पाणी योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाला मुदतीत योजना पूर्ण करता येत नसल्याचे समोर आले आहे. त्याचा विचार करून पाणीपुरवठा मंत्रालयाने जिल्हा परिषदांना सर्व योजना पूर्ण करण्यासाठी सप्टेंबर २०२४ पर्यंत म्हणजे सहा महिन्यांची मुदत वाढवून दिली आहे. त्यामुळे आता या योजनांच्या पूर्ततेसाठी सहा महिन्यांची वाट पाहावी लागणार आहे.

तक्रारीमुळे थांबवली ४५ कामे

जलजीवन मिशनअंतर्गत सातारा जिल्ह्यात एक हजार ४३१ पाणी योजनांची कामे सुरू करण्यात आली. मात्र त्यातील ४५ ठिकाणची कामे ही तेथील जागेची अडचण, तक्रारी, जमीन नावावर करून न देणे, योजनेसाठीच्या कामास हरकती, ठेकेदाराने काम सोडून देणे, बांधकाम विभागाचा प्रश्न आदी कारणांमुळे सुरू झाली, मात्र ती थांबवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्या कामातील त्रुटी दूर करण्यासाठीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ती पूर्तता झाल्यानंतर त्याची पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले.

पाणी योजनांची स्थिती

जिल्ह्यात योजनांची मंजूर कामे १,५५६

काम सुरू करण्याचे आदेश १,५३३

जिल्ह्यात सुरू झालेली कामे १,४३१

प्रगतिपथावर असलेली कामे १,०२८

पूर्ण झालेल्या योजनांची कामे ४०३

अजूनही सुरू न झालेली कामे १०२

प्रगतिपथावरील पाणी योजनांची स्थिती

पाच ते २५ टक्के काम पूर्ण झालेल्या योजना १९३

२५ ते ५० टक्के काम पूर्ण झालेल्या योजना २२८

५० ते ७५ टक्के काम पूर्ण झालेल्या योजना २७६

७५ ते १०० टक्के काम पूर्ण झालेल्या योजना ३३१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT