Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

BG-2 Cotton Variety : ‘बीजी-२’ कापसाच्या दरात ११ रुपये वाढ

Cotton Market : गेल्या हंगामात ८५३ रुपये प्रतिपाकीट असा दर असलेल्या ‘बीजी-२’ कापूस वाणासाठी यंदा ८६४ रुपये असा दर निश्‍चित करण्यात आला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : गेल्या हंगामात ८५३ रुपये प्रतिपाकीट असा दर असलेल्या ‘बीजी-२’ कापूस वाणासाठी यंदा ८६४ रुपये असा दर निश्‍चित करण्यात आला आहे. त्यासंबंधीचे राजपत्र केंद्र सरकारकडून गुरुवारी (ता. ७) प्रकाशित करण्यात आले.

गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा प्रतिपाकीट दरात ११ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढणार आहे. दुसरीकडे या दरवाढीस शुल्लक ठरवून बियाणे उद्योगाने नाराजी व्यक्‍त केली आहे.

देशभरात सुमारे १३० लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड होते. पारंपरिक लागवड पद्धतीत एकरी २ पाकीट तर एचडीपीएस तंत्रज्ञानामध्ये एकरी सहा पाकिटांची गरज राहते. देशाची उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून सघन आणि अतिसघन कापूस लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे.

त्यामुळे गेल्या काही वर्षांत कापूस बियाण्याची मागणी वाढली आहे. त्यातच आता केंद्र सरकारकडून प्रतिपाकीट दरात ११ रुपयांची वाढ केल्याने शेतकऱ्यांचा उत्पादकता खर्च वाढणार आहे.

गेल्या हंगामात ‘बीजी-२’ तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या बियाण्यासाठी प्रतिपाकीट ८५२ रुपयांचा दर होता. यंदा त्यात ११ रुपयांनी वाढ होऊन हे दर ८६४ रुपयांवर पोचले आहेत. दरम्यान केंद्र सरकारने प्रतिपाकीट केलेली अवघी ११ रुपयांची दरवाढ ही येत्या लोकसभा निवडणूका समोर ठेवून केल्याची चर्चा आहे. बियाणे पाकिट ४७५ ग्रॅम वजनाचे असून त्यात ४५० ग्रॅम जीएम बियाणे तर २५ ग्रॅम नॉन जीम बियाणे राहते.

नव तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेसाठी कितीही पैसे खर्च करण्यास तयार आहोत. परंतु शासनाकडून आहे तेच तंत्रज्ञान थोपविले जात आहे. दर नियंत्रित ठेवून त्याआड उपकार केल्यासारखी भूमिका सरकार बजावत आहे. त्याऐवजी कापूस उत्पादकांसाठी जागतिकस्तरावरील तंत्रज्ञान पुरविण्याची गरज आहे.
- गणेश नानोटे, शेतकरी, निंभारा, बार्शीटाकळी, अकोला.
बियाणे उत्पादकता खर्च वाढता असताना अवघी ११ रुपयांची वाढ करणे बियाणे उद्योगासाठी धोक्‍याची घंटा आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षात बियाणे कंपन्यांनी कापूस बियाणे क्षेत्रात नव संशोधनापासून हात आखडता घेतला आहे. नवे तंत्रज्ञान द्यायचे आणि सरकारने दर नियंत्रणात ठेवले तर मग काय ? अशी भीती बियाणे कंपन्यांना आहे. परिणामी आहे तेच पुढे रेटले जात आहे. सरकारने सर्वच क्षेत्रातील महागाईचा विचार करून दर निश्‍चिती करणे अपेक्षीत आहे.
- समीर मुळे, अध्यक्ष, सीड इंडस्ट्री असोसिएशन ऑफ महाराष्ट्र
गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण आज गरजेचे आहे. त्यासाठी तंत्रज्ञान हवे, परंतु दर नियंत्रणात ठेवत सरकारकडून तंत्रज्ञान उपलब्धता केली जात नाही, अशी स्थिती आहे. गुलाबी बोंड अळीमुळे कापूस उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. त्याचा विचार सरकारने गांभीर्याने करावा.
- दिलीप ठाकरे, शेतकरी, मालवाडा, बाळापूर, अकोला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT