Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage In Palghar : पालघरमध्ये अवकाळीमुळे ११ कोटींचे नुकसान

पालघर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीसह फळ बागांना मोठा फटका बसला आहे.

Team Agrowon

Vasai News : पालघर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीसह फळ बागांना मोठा फटका (Fruit Orchard Damage) बसला आहे. बसला डहाणू, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा या पाच तालुक्यात अस्मानी संकटाने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

तर दुसरीकडे जिल्हा कृषी विभागाने पंचनामे पूर्ण करून शासनाकडे ११ कोटी ५० लाख ७९ हजार रुपये मदतीची मागणी केली आहे.

पालघर जिल्ह्यात बागायती मोठ्या प्रमाणात आहे. येथील शेतमाल हा मुंबई, ठाणे यासह आजूबाजूच्या परिसरात तसेच राज्याबाहेर देखील निर्यात केला जातो. अनेक कुटूंब शेती बागायतीवर अवलंबून आहेत.

या उत्पादनातून मिळणाऱ्या पैशातून खर्च भागवला जातो. परंतु वातावरणात झालेला बदल, अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांना लागवडीसाठी केलेला खर्चही वाया गेला आहे.

त्यामुळे महागाईत संसाराचा गाढा कसा हाकणार हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. १९ मार्चपर्यंत झालेल्या अवकाळी पावसात चार तालुक्यांत बागायतीवर परिणाम झाला.

अडीच हजार शेतकरी बाधित

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंचनामे केले. यात दोन हजार ५०० हून अधिक शेतकरी बाधित झाले आहेत. बाधित क्षेत्र पाहता त्यानुसार ११ कोटीहून अधिक नुकसानीची मागणी करण्यात आली आहे.

भरपाईची प्रतीक्षा

पालघर जिल्ह्यात मार्च महिन्यात अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे बागायतीचे नुकसान झाले. यात प्रामुख्याने काजू आणि आंब्याचे प्रचंड नुकसान झाले. तसेच भाजीपाला लागवडीवरही परिणाम झाला. त्यामुळे नुकसान भरपाई कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT