Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : शिरसी येथे १०२ मिमी पाऊस मॉन्सूनोत्तर पावसामुळे पिकांचे नुकसान

Rain Update : गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मॉन्सूनोत्तर पाऊस पडत आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.

Team Agrowon

Pune News : गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मॉन्सूनोत्तर पाऊस पडत आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. बुधवारी (ता.१६) सकाळी आठ वाजेपर्यंत सांगलीतील शिरशी येथे १०२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे शेतीकामांमध्ये अडथळे येत असून, सोयाबीन पिकाला मोड येऊ लागल्याने नुकसान होऊ लागले आहे.

सध्या मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका दररोज सुरूच आहे. सकाळी काही प्रमाणात ढगाळ वातावरण असले तरी दहा वाजेनंतर ऊन पडण्यास सुरुवात होत आहे. दुपारी चांगलेच कडक ऊन पडत आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ होत असून कमाल तापमानात वाढ होत आहे. मात्र, सायंकाळनंतर वातावरणात बदल होत, रात्री काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. त्यातच पावसाने उघडीप दिल्यामुळे सध्या सोयाबीन, कापूस, भुईमूग या पिकांची काढणी वेगाने सुरू आहे. त्यामुळे काढणी केलेल्या पिकांचे पावसामुळे नुकसान होत आहे.

पुणे जिल्ह्याच्या विविध भागांत पाऊस पडत आहे. इंदापूर येथे सर्वाधिक ३५ मिलिमीटर पाऊस पडल्यामुळे मळणीच्या कामांना विलंब होत आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे ३१ मिलिमीटर पाऊस पडला असून उर्वरित भागात पावसाची उघडीप होती. सोलापुरातील पेनूर, तुंगत येथे ५८ मिलिमीटर पाऊस पडला असून, मोहोळ येथे ५१, नातेपुते ४६, करकंब ४१ मिलिमीटर पाऊस पडला. साताऱ्यातील पिंपोडे-बु येथे ५४ मिलिमीटर, तर पाचगणी ५१ मिलिमीटर, सांगलीतील नेवरी येथे ६४ मिलिमीटर, भाळवणी ६२, वाळवा ६३, लेंगरे ५९, मनेराजुरी ५५, शिराळा ५१ मिलिमीटर, कोल्हापुरातील पन्हाळा येथे ८१ मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे भातपिकांचे नुकसान होऊ लागल्याने शेतकरी अडचणीत येत आहेत.

कोकणातही मागील दोन दिवसांपासून पाऊस कायम आहे. या पावसामुळे भात खाचरे पुन्हा भरू लागल्याने निसवण्याच्या अवस्थेत असलेल्या भात पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. रायगडमधील इंदापूर, निजामपूर येथे २० मिलिमीटर, तर पोलादपूर, वाकण २६ मिलिमीटर पाऊस झाला. रत्नागिरीतील कळकवणे येथे ८६ मिलिमीटर तर, आंबवली, कुळवंडी ७२ मिलिमीटर पाऊस झाला. सिंधुदूर्गमध्येही शिरगाव, बापर्डे ५१ मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे ओढे, नाले पुन्हा पावसाच्या पाण्याने वाहू लागले आहेत.

बुधवारी (ता.१६) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

कोकण : चिपळूण ५७, खेर्डी ५२, मार्गताम्हाणे ५४, रामपूर ६४, सावर्डे ४९, शिरगांव ६६, दापोली ४२, बुरोंडी, दाभोळ ४०, शिर्शी, दाभीळ ६८, भरणे ४७, धामणंद ५२, आबलोली ५०, देवरुख ४०, कोंडये ४६, कुंभवडे ४२, पडेल ४४, पाटगाव ४१, पोइप ४०, कणकवली ४३.

मध्य महाराष्ट्र : टेंभुर्णी ३१, इस्लामपूर, पिलीव ३५, माळशिरस ३८, सदाशिवनगर ३३, वेळापूर ३९, आनेवाडी ३०, पाटण, म्हावशी, हेळवाक, मोरगिरी, पुसेसावळी ३४, ढेबेवाडी ३१, तळमावले ३८, कुठरे, खंडाळा ३७, कोळे ३५, वाठार-स्टेशन ३५, निमसोड, मार्डी ४०, दहिवडी, गोंदवले, म्हसवड ४१, शिंगणापूर ४६, फलटण ४५, आदर्की ४४, वाठार-नि ४८, राजाळे ३३, पसरणी ३९, पाचवड ३४, ओझर्डे ४२, सुरूर ४३, सांगली ३३, कवलापूर, इस्लामपूर ४२, बेडग ४५, भोसे ३१, खानापूर ३६, कुरळूप, चिकुर्डे ३०, पेठ ३८, बहे ३२, आष्टा ३०, कामेरी ४३, तासगाव ३५, कोकरूड ४०, सागाव, दिघंची ३७, खरसुंडी ३२, भिलवडी ३१, वांगी ४५, चिंचणी ३६, शाळगाव ३०, हेर्ले ३१, वडगाव ४२, वाठार ४४, वाडी-रत्नागिरी ३१, भेडसगाव ४३, मलकापूर ३३, आंबा ४६.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT