Gokul Dudh Sangh Agrowon
ॲग्रो विशेष

Gokul Doodh Sangh : ‘गोकुळ’कडून दूध संस्थांना व्यवस्थापन खर्चापोटी १० पैसे वाढ

Gokul Milk : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे (गोकुळ) जिल्ह्यातील प्राथमिक दूध संस्थांच्या व्यवस्थापन खर्चामध्ये प्रतिलिटर १० पैसे व संस्था सचिवांना ५ पैसे वाढीचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे (गोकुळ) जिल्ह्यातील प्राथमिक दूध संस्थांच्या व्यवस्थापन खर्चामध्ये प्रतिलिटर १० पैसे व संस्था सचिवांना ५ पैसे वाढीचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. येत्या १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली. गोकुळच्‍या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

महाराष्ट्रात गाय दूध खरेदी दरामध्ये गोकुळ आघाडीवर असून, शासनापेक्षा प्रतिलिटर ८ रुपये जास्त दर देत आहे. गोकुळने दूध उत्पादकास सर्वसाधारण ८२ टक्के रकमेचा परतावा दिला असून, दूध बिलापोटी दर १० दिवसाला सरासरी ७० कोटी रुपये अदा केले जातात. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हैस, गाय दूध दर शासन दरापेक्षा ८ रुपये जास्त देत आहोत.

राज्यात सर्वाधिक अडीच कोटी रुपयांचे गाय दूध अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहे. दूध संस्थांच्या बळकटी करणासाठी १ एप्रिल २०२४ पासून दूध संस्थांना व्यवस्थापन खर्चात प्रतिलिटर १० पैसे व दूध संस्था कर्मचारी यांना प्रोत्साहन पर ५ पैसे वाढ करण्यात येणार आहे.

या वेळी विविध दूध उत्पादकांचा सत्कार झाला. गाय, म्हैशी यांच्या उत्तम आरोग्यासाठी नवीन प्रीमियम महालक्ष्मी कोहिनूर डायमंड, महालक्ष्मी टी.एम.आर. मॅश तसेच संघ व उत्पादक संस्थेत पारदर्शकता राहण्यास मदत होण्यासाठी ऑटो मिल्क सॅम्पलर युनिटचे उद्‌घाटन आदी कार्यक्रम झाले.

प्रास्‍ताविक संघाचे ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील यांनी केले. संचालक अजित नरके यांचे या वेळी भाषण झाले. संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Santosh Kakde: चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे विभागात अव्वल 

Agriculture Scheme: जुनी विहीर दुरुस्तीसाठी १ लाखांपर्यंत अनुदान; शेतकऱ्यांसाठी विशेष योजना

Farmer loan Waiver: कर्जमाफीसाठी मुंबई एकदिवस बंद करा; बच्चू कडू यांची राज ठाकरेंकडे मागणी 

Forest Encroachment: वनजमिनीवर अतिक्रमणकर्त्यांवर फौजदारी

Ambajogai KVK: अंबाजोगाई केव्हीकेमध्ये ‘किसान गोष्टी’

SCROLL FOR NEXT