Cabinet Meeting Decision Agrowon
ॲग्रो विशेष

Salary of Kotwal : कोतवालांच्या मानधनात १० टक्के वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत ३८ लोककल्याणकारी निर्णय

Roshan Talape

Pune News : राज्यातील कोतवालांच्या मानधनात १० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.३०) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने एकूण ३८ महत्त्वाचे लोककल्याणकारी निर्णय घेतले आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थित होते.

कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास किंवा गंभीर आजार, अपघातामुळे कर्मचारी असमर्थ ठरल्यास, त्यांच्या वारसांना शासनाच्या अनुकंप धोरणानुसार नियुक्ती देण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

ग्राम रोजगार सेवकांना मानधन

महायुती सरकारने कोतवालांच्या मानधनात १० टक्के वाढ आणि ग्राम रोजगार सेवकांना ८ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णयाला मंजूरी दिली आहे.

यात २ हजार दिवसांपेक्षा अधिक काळ सेवा झालेल्या ग्राम रोजगार सेवकांना शासनाकडून मजुरी खर्चाच्या १ टक्के प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे दीर्घकाळ काम करणाऱ्या सेवकांना आर्थिक लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे कोतवाल आणि ग्राम रोजगार सेवकांना आर्थिक लाभ मिळणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील प्रशासन आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असल्यामुळे राज्यातील महायुती सरकार महत्त्वाचे निर्णय घेत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना प्रभावित करण्यासाठी हे निर्णय घेतले जात असल्याचा असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement : सरकार सोयाबीनचे पेमेंट २ दिवसांत देणार ? उद्यापासून हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नावनोंदणी सुरु होणार

Soybean Cotton Subsidy : दीड लाखावर शेतकरी कापूस, सोयाबीन अर्थसाह्यापासून वंचित राहण्याची शक्यता

E-Peek Pahani : खरिपातील ७ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्राची ई-पीकपाहणी

Agrowon Podcast : कांदा भावात नरमाई; कापूस, सोयाबीन, डाळिंब तसेच काय आहेत आले दर ?

Strawberry Nurseries Rain Damage : पावसाने स्ट्रॉबेरी रोपवाटिकांचे नुकसान, लागवडी रखडल्याने शेतकरी चिंतेत

SCROLL FOR NEXT