Kolhapur Sugarcane agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Sugarcane : कोल्हापूर विभागात ऊस गाळप हंगाम जोमात, गतवर्षीच्या तुलनेत यंदा पिछाडी

Sugarcane : कोल्हापूर जिल्ह्यात सहकारी १६ कारखान्यांनी ८८ लाख टन ऊस गाळप केले आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Sugarcane Production : राज्यातील ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू झाला परंतु कोल्हापूर जिल्ह्यात उसाच्या दरावरून साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात सुरू झालेल्या संघर्षामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील गळीत हंगाम तब्बल ३ आठवडे लांबणीवर गेला. यामुळे जिल्ह्यातील साखर कारखाने सुरूवातील संथ गतीने सुरू होते. दरम्यान जानेवारीच्या सुरूवातीपासून जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी जोर धरला आतापर्यंत कोल्हापूर विभागात एक कोटी ९२ लाख टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे.

कोल्हापूर विभागात ऊस गाळप हंगाम जोमात सुरू असून, आतापर्यंत एक कोटी ९२ लाख टन ऊस गाळप करून दोन कोटी १६ लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. विभागाचा ११.२६ टक्के साखर उतारा राहिला असून, सव्वादोन कोटी ऊस गाळप होईल, दरम्यान १५ एप्रिल पर्यंत हंगाम चालेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

गतवर्षी १४ फेब्रुवारीला १ कोटी ९७ लाख टन ऊस गाळप केले होते. कोल्हापूर जिल्ह्यात सहकारी १६ कारखान्यांनी ८८ लाख टन ऊस गाळप केले आहे. तर खासगी सात साखर कारखान्यांनी ३१ लाख टन ऊस गाळप केले आहे जिल्ह्यात २३ साखर कारखान्यांनी एक कोटी २० लाख टन ऊस गाळप केले आहे.

जिल्ह्याचा ११.४६ टक्के साखर उतारा राहिला असून १ कोटी ३७ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सांगली जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी ७२ लाख टन ऊस गाळप करून ७९ लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. सांगली जिल्ह्याचा उतारा १०.९३ टक्के राहिला आहे. दोन्ही जिल्ह्याचा मिळून एक कोटी ९२ लाख टन उस गाळप करून दोन कोटी सोळा लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.

विभागाचा सरासरी साखर उतारा ११.२६ टक्के राहिला आहे. यंदा जिल्ह्यासह राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे आडसाली व पूर्व हंगामी उसाचे क्षेत्र घटले आहे. त्यामुळे पुढील हंगामात उसाचे क्षेत्र कमी होऊन साखर कारखान्यांना गाळप हंगाम उद्दिष्ट गाठण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. तसेच साखरेचे दरही वाढतील, असा अंदाज आहे.

तसेच निर्यातबंदी केल्यामुळे साखरेचे भाव पडले आहेत. यामुळे साखर कारखान्यांची साखर विक्री थंडावली असून साखरेची थप्पी कारखान्याबाहेर लावली जात आहे. साखर कारखान्यांना शेवटची ऊस बिले देताना व अंतिम दर देताना अडचणी निर्माण होतील असे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Bhavantar : मध्य प्रदेश सरकारने सोयाबीनचा भावफरक केला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा; महाराष्ट्रात मात्र सोयाबीन खरेदी कासव गतीने

Farmers Protest: ‘सीनारमास’ विरोधात शेतकरी आक्रमक

Lumpy Skin Disease: लम्पी रोग पुन्हा फोफावला! शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?

Soybean Procurement: सोयाबीन खरेदी केंद्रांच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळेना

Kolhapur Politics: कागलच्या राजकारणाला कलाटणी, कट्टर विरोधक हसन मुश्रीफ- समरजितसिंह घाटगे एकत्र, युतीची घोषणा

SCROLL FOR NEXT