रशिया युक्रेन युद्धामुळे युक्रेन सरकारने शेतीमालाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. पण आता तशी परिस्थिती नाही. 
बाजारभाव बातम्या

युक्रेनने मका आणि सूर्यफूल तेलावरील निर्यातबंदी उठवली!

रशिया युक्रेन युद्ध : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर देशांतर्गत मागणी भागवण्यासाठी काही ठराविक शेतीमालाच्या निर्यातीवर बंदी घातली होती.

Mayur Girhe

पुणे : रशियाने गेल्या महिन्यात युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनने मका आणि सूर्यफूल तेलाच्या निर्यातीवर घातलेली बंदी उठवली आहे. युद्धकाळात देशांतर्गत मागणी पुरवण्यासाठी शेतमालांचा साठा कमी पडू नये, म्हणून निर्यातबंदीचे पाऊल उचलण्यात आले होते. युक्रेनने जारी केलेल्या अधिसुचनेतून हा निर्णय समजल्याचे ॲग्रीसेन्सस या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. मात्र, इतर शेतमाल आणि व्यापारी वस्तुंच्या निर्यातबंदीबाबत ही अधिसुचना काहीही स्पष्ट करत नाही. त्यामुळे इतर मालावर बंदी कायम असल्याचे मानले जात आहे.

गेल्या महिनाभरापासून मका आणि सूर्यफूल तेलाच्या मर्यादीत आणि मान्यताप्राप्त निर्यातीसाठी व्यापाऱ्यांना परवाने घ्यावे लागत होते. युक्रेन सरकारने हे परवाने घेण्याची प्रक्रिया सोपी ठेवण्याचा प्रयत्न केला असला तरी निर्यातीवरील निर्बंध उठवल्याचे युक्रेनच्या उद्योगविश्वाने स्वागत केले आहे. युद्धामुळे सध्या युक्रेनमधून कुठल्याही मालाची निर्यात बंद आहे. त्यामुळे मका आणि सूर्यफूल तेलाच्या निर्यातीसाठी मिळालेली परवानगीकडे एक सकारात्मक पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

युक्रेनमध्ये पीकणाऱ्या शेतमालापैकी जवळपास ९५ टक्के शेतमाल हा काळ्या समुद्रामार्गे निर्यात होत असतो. मारिओपोल, ओडेसा, आणि मायकोलाइव्ह या बंदरांमधून या शेतमालाची जगभर निर्यात केली जाते. सध्या मारिओपोलवर रशियाच्या सैनिकांचे आक्रमण सुरू असून त्यांचे पुढील उद्दीष्ट ओडेसा या बंदरावर ताबा मिळवण्याचा असेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

गेल्या २४ फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता. यात युक्रेनच्या शेतीचेही नुकसान झाले असून येता गहू पेरणी हंगामही धोक्यात असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पाच मार्चला युक्रेन सरकारने जिवनावश्यक वस्तुंची आणि अन्नधान्यांची निर्यात थांबवली होती. या यादीत राय आणि बकव्हिट नावाच्या भरडधान्यासहित, इतर भरडधान्ये, साखर, ओट्स, मीठ, जनावरे, मांस, इतर प्राणीज पदार्थ, गहू, मका, सूर्यफूल तेल, चिकन, आणि अंड्यांचा समावेश होता.

गेल्या नऊ मार्चला या यादीत बार्ली, दळलेली किंवा साबूत मोहरी, आणि प्राणीज किंवा सेंद्रिय खतांचाही समावेश करण्यात आला होता. युद्धादरम्यान या मालांची मागणी वाढू शकते, अशी भीती तेथील सरकारला होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT