Agriculture Market Bulletin Agrowon
बाजारभाव बातम्या

Market Bulletin: युक्रेनमधील या शेतीमाल उत्पादन घटीचा भारताला फायदा?

तळकोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यताही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Anil Jadhao 

1. राज्यात उन्हाचा चटका कायम असल्याबरोबरच आता पावसाला (Rain) पोषक हवामान होत आहे. अकोला येथे सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशातील उच्चांकी ४४.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर चंद्रपूर, अकोला, जळगाव, मालेगाव येथे तापमानाचा (temperature) पारा ४३ अंशांच्या पुढे, तर वर्धा, यवतमाळ, अमरावती, धुळे, परभणी येथे तापमान ४२ अंशांच्या वर होता.उद्या विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. तळकोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यताही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

2. उन्हामुळे मागणी वाढल्याने लिंबाच्या दरात चांगलीच तेजी आली आहे. लिंबाचे (lemon) दर ६००० ते ७००० रुपये क्विंटलवरून थेट ९००० ते दहा हजार रुपये पोहोचले आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने ही दरवाढ झाल्याचे व्यापारी (Merchant) सूत्रांकडून सांगण्यात आले. विदर्भातील सर्वच किरकोळ विक्रेत्यांकडून मागणी वाढल्याने लिंबाचे (lemon) दर १७० ते २०० रुपये किलोवर पोहोचले आहेत. त्यामुळे लिंबाच्या दरात चांगलीच तेजी अनुभवली जात आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने दर वधारल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

3. कर्नाटक सरकार राज्यातल्या चार कृषी विद्यापीठात (Agriculture University) नैसर्गिक शेती करून बघणार आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या अखत्यारीतील शेतजमिनींवर रासायनिक खतं,कीडनाशकं न वापरता शेती करून बघितली जाणार आहे. बंगळुरू, धारवाड, रायचूर आणि शिवमोग्गा विद्यापीठा अंतर्गत कृषी विज्ञान केंद्रांकडील प्रत्येकी १ हजार एकर शेतजमिनीत सती जी पिकं घेतली जातात तिथं हा प्रयोग होणार आहे. या शेतजमिनीत भातपीक, गहू, (Wheat) कडधान्य, भरडधान्य, फळं अन भाजीपाला घेणार आहेत. एप्रिल ते मे दरम्यान ही लागवड होणार असल्याचं कृषी मंत्री बी.सी. पाटील यांनी सांगितलंय. ज्या भागात भौगोलिक परिस्थितीनुसार अन उपलब्ध पाण्यानुसार जी पिकं घेतली जातात त्याच पिकांची लागवड केली जाणार आहे.

4. भारताने मार्च २०२२ मध्ये उच्चांकी ४०.३८ अब्ज रुपयांवर व्यापारी मालाची निर्यात केलीयं. मागील वर्षी याच कालावधितील ३५.२६ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत यंदा निर्यातीत १४.५३ टक्क्यांची वाढ झालीयं. तर मार्च २०२० मधील २१.४९ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत निर्यात ८७.८९ टक्क्यांनी वाढलीय. एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या आर्थिक वर्षात नॉन-पेट्रोलियम वस्तूंच्या निर्यातीतही (Export) मोठी वाढ झाल्याचं गोयल यांनी सांगितलंय. यावर्षी नॉन-पेट्रोलियम वस्तूंची निर्यात ३५३.७६ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झालीयं. मागील वर्षीच्या (एप्रिल २०२० ते मार्च २०२१) २६६ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत निर्यात ३२.६६ टक्क्यांनी वाढलीयं.

5. रशिया आणि युक्रेनमधील युध्दामुळे गहू, सूर्यफूल तेल (Oil) बार्ली, राई आणि मक्यासह इतर शेतीमालाची निर्यात ठप्प झाली. त्यामुळे भारतातून विक्रमी गहू निर्यात झाली. तर मका निर्यातीलाही पडतळ मिळतेय. परिणामी देशातील शेतऱ्यांना गहू आणि मक्याला चांगले दर मिळत आहेत. सध्या युक्रेनमधील वसंत ऋतुतील पेरणी सुरू झाली. मात्र ही पेरणी केवळ युक्रेनच्या ताब्यातील क्षेत्रात सुरु आहे. रशियन सैन्याच्या ताब्यातील शेतांवर लागवड होणे कठिण आहे. त्यामुळे यंदा येथे पेरणीत मोठी घट होणार आहे. परिणामी पिकांचे उत्पादनही कमीच राहिल. येथील संस्थांच्या मते वसंत ऋतुतील गहू उत्पादन तब्बल ५४ टक्क्यांनी कमी राहिल. यंदा येथे १४९ लाख टनच गहू मिळेल, असं या संस्थेचं म्हणणये. तर राईचे उत्पादन ७१ टक्क्यांनी कमी होणार आहे. मक्याच्या उत्पादनातही ५६ टक्क्यांची घट येणार आहे. यंदा येथे केवळ १८५ लाख टन मका मिळेल. सूर्यफुलाचेही उत्पादन ४५ टक्क्यांनी कमी राहिल. यंदा युक्रेनमध्ये केवळ ९२ लाख टन सूर्यफूल (Sunflower) हाती येईल, असं या संस्थेचं म्हणणये. त्यासोबतच मोहरी उत्पादन १९ टक्के आणि सोयाबीन उत्पादन २३ टक्क्यांनी घटेल. युक्रेनमधील शेतीमाल उत्पादन घटीचा भारतीय शेतकऱ्यांना फायदा मिळू शकतो. गहू, मका आणि सूर्यफूल उत्पादन घटल्यास भारतात या शेतमालांचे दर वाढतात. सूर्यफुल तेल कमी मिळाल्यास देशातील सोयाबीनला दर मिळू शकतात. भारतीय गहू आणि मक्याला (Maize) मागणी राहू शकते, असे जाणकारांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT