Soyabean Market Agrowon
बाजारभाव बातम्या

Soyabean Market News : अकोल्यात सोयाबीन आवकेत मोठी वाढ ; दर सरासरी ४२०० रुपये

Soyabean Harvesting : खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची काढणी, मळणी जोमाने सुरू झाली असून बाजारपेठेतील आवकेतही मोठी वाढ झाली आहे.

Team Agrowon

Akola News : खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची काढणी, मळणी जोमाने सुरू झाली असून बाजारपेठेतील आवकेतही मोठी वाढ झाली आहे. येथील बाजार समितीतील आवक पाच हजार क्विंटलवर पोहोचली आहे.

मंगळवारी (ता. १७) ५८०० क्विंटलपेक्षा जास्त आवक झाली होती. बुधवारी (ता. १८) ५७७८ क्विंटल आवक झाली. बाजारात सोयाबीन दर सरासरी ४२०० रुपयांपर्यंत आहेत.

यंदाचा सोयाबीन हंगाम सध्या जोराने सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत बाजारात जुने सोयाबीन अधिक येत होते. मात्र, आता नवीन सोयाबीनची आवक होत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच नवीन सोयाबीनच्या आवकेत सुधारणा झाली.

मंगळवारी ५८९८ पोते सोयाबीनची उलाढाल झाली. सोयाबीनला किमान ३२०० ते कमाल ४५१० रुपयांचा दर होता. सरासरी ४२०० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

मागील दोन दिवसांपासून सोयाबीनची या बाजार समितीत पाच हजार पोत्यांपेक्षा जास्त आवक होत आहे. दोनच दिवसांत साडेअकरा हजार क्विंटल सोयाबीनची उलाढाल झाली. सोयाबीनची काढणी यंदा एकरी २८०० ते ३५०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मळणीचाही दर १४० ते २०० रुपये प्रतिपोते आकारला जात आहे.

वातावरण चांगले असल्याने आता बाजारात आवक होत असलेल्या सोयाबीनमधील आर्द्रता कमी झाली आहे. मालाचा दर्जाही चांगला आहे. परंतु दर दबावात असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. रब्बी हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी खरिपातील सोयाबीन विकून पैशाची तजवीज करीत आहेत. या पैशातून बी-बियाणे, खते, मशागतीचे काम करीत करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Protest: ओला दुष्काळ, कर्जमाफीसाठी शुक्रवारपासून राज्यभर आंदोलन

Mangesh Sable Hunger Strike: सरपंच मंगेश साबळे यांनी आठव्या दिवशी उपोषण सोडले

Rain Crop Loss: मुसळधारेने सोयाबीन, कापसाची धुळधाण

Nanded Heavy Rainfall: नांदेडला पुन्हा जोरदार पाऊस

Flood Crisis: ‘मनुदेवी’च्या प्रकोपाने आमचे व्हत्याच नव्हते झाल..

SCROLL FOR NEXT