Soyabean
SoyabeanAgrowon

Soyabean Market Rate : मुहूर्ताच्या सोयाबीनला साडेचार हजारांचा भाव

Soyabean Market Price : सध्या हंगामातील नव्या सोयाबीनची आवक बाजारात होत असून मुहूर्ताच्या सोयाबीनला ४५०० रुपये क्‍विंटलचा दर मिळाला.
Published on

Wardha News : शेतकऱ्यांसाठी दिवाळी बोनस म्हणून सोयाबीनला मान्यता आहे. सध्या हंगामातील नव्या सोयाबीनची आवक बाजारात होत असून मुहूर्ताच्या सोयाबीनला ४५०० रुपये क्‍विंटलचा दर मिळाला. बाजार समितीचे सभापती अमित गावंडे यांच्या उपस्थितीत ही खरेदी झाली.

Soyabean
Soybean Rate : सोयाबीनचे रेट आज वाढले का?

राज्यात सोयाबीनवर सुरुवातीला यलो मोझॅक त्यानंतर मूळकुज व इतर कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला. ऐन काढणीच्यावेळी झालेल्या या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकऱ्यांवर पीक गमावण्याची वेळ आली आहे. काही शेतकऱ्यांची उत्पादकता घटली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सोयाबीनचे दर वधारतील, अशी शक्‍यता असताना ओलाव्याचे कारण देत दर दबावात ठेवले जात आहेत.

वर्धा बाजार समितीमध्ये सोमवारी (ता.९) हंगामातील नव्या सोयाबीनची आवक नोंदविण्यात आली. पहिल्या दिवशी सुमारे २०० क्‍विंटलची आवक झाल्याचे बाजार समिती सूत्रांकडून सांगण्यात आले. मुहूर्ताच्या सोयाबीनला ४,४०० ते ४,५५१ रुपयांचा भाव मिळाला. बाजार समितीचे सभापती अमित गावंडे, उपसभापती पांडुरंग देशमुख यांच्या हस्ते शेतकरी शुभम भुतडा, रवींद्र कुचेवार व कमलेश क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी संचालक विलास मेघे, महेश भुतडा, मुकुंद बेलखेडे, व्यापारी सोनू जावंधिया, मनीष गंगमवार, मोहन चितलांगे, मनोज जगताप, गिरीधर चितलांगे, नीरज ढोक, गौरव उमरे, गोविंद चांडम, महेश पंजवाणी, पप्पू चांडक व शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी आर्थिक संरक्षणाच्या उद्देशाने बाजार समितीतच आपला शेतमाल विक्रीसाठी आणावा, असे आवाहन यावेळी सभापती अमित गावंडे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com