राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ६०० ते २००० रुपये
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ६०० ते २००० रुपये 
बाजारभाव बातम्या

राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ६०० ते २००० रुपये

टीम अॅग्रोवन

परभणीत ६०० ते १००० रुपये 

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. १४) टोमॅटोची ७०० क्विंटल आवक होती. टोमॅटोला प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये दर मिळाला, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या येथील मार्केटमध्ये औरंगाबाद जिल्हा, आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्य तसेच स्थानिक परिसरातून टोमॅटोची आवक होत आहे. गेल्या महिनाभरात ५०० ते १००० क्विंटल झाली. त्या वेळी प्रतिक्विंटल सरासरी ६०० ते १५०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. १४) टोमॅटोची ७०० क्विंटल आवक असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये होते. तर किरकोळ विक्री प्रतिकिलो १५ ते २० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

जळगावात ७५० ते १६०० रुपये दर

 कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १४) टोमॅटोची २० क्विंटल आवक झाली. टोमॅटोला प्रतिक्विंटल ७५० ते १६०० आणि सरासरी ११७५ रुपये दर मिळाला. आवक जामनेर, पाचोरा, यावल, जळगाव व औरंगाबाद जिल्ह्यांतील घाट परिसरातून होत आहे. आवक सध्या स्थिर असून, दरही टिकून आहेत. या आठवड्यात दरवाढ झाली आहे. मागील पंधरवड्यात सरासरी दर ६०० रुपयांपर्यंतच होते. परंतु जसा उठाव वाढला, तसे दरही स्थिरावल्याचे सांगण्यात आले. पुढे आवक कमी होऊ शकते, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

औरंगाबादेत ११०० ते १५०० रुपये 

औरंगाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १४) टोमॅटोची १५३ क्‍विंटल आवक झाली. त्याला ११०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये १ जानेवारी २०१९ ला टोमॅटोची १२४ क्‍विंटल आवक झाली. या टोमॅटोला ५०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ७ जानेवारीला १३० क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर १००० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १४ जानेवारीला टोमॅटोची आवक १४५ क्‍विंटल, तर दर ५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २३ जानेवारीला १४७ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला १०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २८ जानेवारीला ३८१ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर ५०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३१ जानेवारीला २८० क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला ७०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

२ फेब्रुवारीला १६५ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर ३०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ५ फेब्रुवारीला टोमॅटोची आवक १४५ क्‍विंटल झाली. या टोमॅटोला ६०० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ९ फेब्रुवारीला १७२ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर ५०० ते १७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १३ फेब्रुवारीला १६२ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला १००० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

Agriculture Irrigation : भामा-आसखेडच्या आवर्तनाची प्रतीक्षा

Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

SCROLL FOR NEXT