sweet lemon prices improve in Kalmana market
sweet lemon prices improve in Kalmana market 
बाजारभाव बातम्या

कळमना बाजारात मोसंबी दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन

नागपूर : मागणीअभावी संत्रा दरात घसरण झाली आहे. कळमना बाजार समितीत ११०० ते १४०० रुपये क्विंटल दराने संत्र्याचे व्यवहार होत आहेत, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. याउलट मोसंबी दरात सुधारणा झाली आहे. मोसंबीचे व्यवहार ३२०० ते ३६०० रुपये क्विंटलने होत असल्याचे सांगण्यात आले.

संत्रा लागवडीखाली विदर्भात सुमारे दीड लाख हेक्‍टर क्षेत्र आहे. यावर्षी पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे संत्र्यावर अपेक्षित रंगधारणा झाली नाही.  त्यासोबतच देशाच्या इतर भागात देखील पाऊस होता. परिणामी, संत्र्याला मागणी नव्हती. अशा विविध कारणांमुळे कळमना बाजार समितीत दरात घसरण अनुभवली जात आहे.

गेल्या आठवड्यात मोठ्या आकाराच्या संत्रा फळाला १२०० ते १५०० रुपये असा दर मिळाला. संत्र्यांची आवक ३००० क्विंटल होती. या आठवड्यात देखील संत्र्याचे दर स्थिर होते. आवक मात्र गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढून ६००० क्विंटलवर पोहोचली. याउलट मोसंबी दरात सुधारणा झाली.

गेल्या आठवड्यात मोसंबीचे दर ३६०० ते ४ हजार होते. आवक एक हजार क्विंटलची होती. या आठवड्यात देखील मोसंबीचे दर घसरत ३२०० ते ३६०० रुपयांवर पोहोचले. आवक कमी होत अवघ्या ५०० क्विंटलवर पोहोचली आहे. बाजारात द्राक्ष ६००० ते  ८००० क्विंटल होते. आवक १३ क्विंटल झाली.

डाळिंबांची आवक १४७३ क्विंटल आहे. दर दोन हजार ते सहा हजार असे राहिले. बाजारात बटाट्याची २३४८ क्विंटल आवक झाली. दर ३५०० ते ४००० रुपये होते. कांदा दरात काहीशी घसरण झाली. पांढरा कांदा ४००० ते ५५०० रुपये क्विंटल होता. दर ४५०० ते ५००० रुपये झाले. 

लसणाची आवक ६०३ क्विंटल झाली. दर ५००० ते ९००० रुपये मिळाला. आल्याची आवक ७५४ क्विंटल होती. २३०० ते २५०० रुपये दर मिळाला. टोमॅटोला २००० ते २२०० रुपये दर मिळाला. हरभऱ्याची आवक १७६ क्विंटल होती. दर ४३०० ते ४८०० रुपये मिळाला. सोयाबीनचे व्यवहार ३७०० ते ४४१० रुपयांनी झाले. 

सोयाबीनची आवक कमी

सोयाबीनची आवक कमी झाली. गेल्या आठवड्यात ९५१ क्विंटल आवक होती. या आठवड्यात ती अवघ्या ५०१ क्विंटलवर आली. भुईमूग शेंगाचे व्यवहार ४५०० ते ५००० रुपये क्विंटलने झाले. आवक अवघी १० क्विंटल आहे. शेंगा दर ४००० ते ४२०० क्विंटल होते. गव्हाचे दर १५०० ते १६०० रुपये, तर आवक ४१२ क्विंटल होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT