Pomegranate prices in Nashik maintained due to demand
Pomegranate prices in Nashik maintained due to demand 
बाजारभाव बातम्या

नाशिकमध्ये डाळिंबाचा दर मागणीमुळे टिकून

टीम अॅग्रोवन

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहात डाळिंबांची आवक ६,३२५ क्विंटल झाली. मृदुला वाणास ५०० ते १३,५०० तर सरासरी ६,५०० रुपये दर मिळाला. आवक वाढूनही सणासुदीला मागणी आहे. त्यामुळे दर टिकून असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

अतिवृष्टीचा तडाखा बसल्याने भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पालेभाज्या व फळभाज्यांची आवक सध्या कमी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आवकेनुसार दर निघाले. वालपापडी-घेवड्याची आवक ६४७२ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ४,००० ते ५,७०० असा तर सरासरी दर ४,८०० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल २,५०० ते ४,२००, तर सरासरी दर ३,५०० रुपये राहिला. हिरवी मिरचीची आवक २०६ क्विंटल झाली. 

लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल २,५०० ते ४,००० रुपये, तर सरासरी दर ३,७०० रुपये मिळाला. वाटाण्याची आवक ४९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १२,००० ते १५,५००, तर सरासरी दर १३,७०० रुपये राहिला. गाजराची आवक ३,९१२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २,००० ते २,५०० तर सरासरी दर २,३०० रुपये राहिला. फळभाज्यांमध्ये टोमॅटोला १५० ते ७५१, तर सरासरी ५००, वांगी ४०० ते ८००, तर सरासरी ६०० व फ्लॉवर १२५ ते २८० सरासरी २०० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला ६०० ते ९००, तर सरासरी दर ७५० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले.

वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा १०० ते २७५, तर सरासरी २००, कारले १३० ते ३०० तर सरासरी १८५, गिलके २०० ते ४०० तर सरासरी ३१५, दोडका १५० ते ३०० तर सरासरी दर २२० रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले. चालू सप्ताहामध्ये कांद्याची आवक ९,५०६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ६५० ते २,७०० मिळाला. तर, सरासरी दर २,००० रुपये राहिला.

बटाट्याची आवक ६,७१५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ६०० ते १,७००, तर सरासरी दर ९०० रुपये राहिला. लसणाची आवक २८८ क्विंटल झाली.त्यास प्रतिक्विंटल ३,००० ते ८,२०० तर सरासरी दर ६,५०० रुपये राहिला. फळांमध्ये चालू सप्ताहात केळीची आवक ९२० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ८५० ते १,५०० तर सरासरी दर १,२५० रुपये मिळाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

Agriculture Irrigation : भामा-आसखेडच्या आवर्तनाची प्रतीक्षा

Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

SCROLL FOR NEXT