औरंगाबादमध्ये मूग, उडदाची आवक नगण्य
औरंगाबादमध्ये मूग, उडदाची आवक नगण्य 
बाजारभाव बातम्या

औरंगाबादमध्ये मूग, उडदाची आवक नगण्य

Santosh Munde

औरंगाबाद: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मूग व उडिदाची आवक नगण्य प्रमाणात होत आहे. गत आठवड्यात केवळ एकदाच नव्या बाजरीची आवक झाली. गत हंगामातील हरभरा, ज्वारी, मका, तुरीची आवकही बाजार समितीत कमी अधिक प्रमाणात होत असल्याचे बाजारसमितीच्या सूत्रांनी सांगितले. येथील बाजार समितीत गत सप्ताहात बाजरी, उडीद व मुगाची आवक व दरात चढ-उतार पाहायला मिळाला. याची आवक औरंगाबाद तालुक्यातूनच होत आहे. बाजार समितीत बाजरीची ४८ ते १०३ क्विंटल दरम्यान आवक झाली. जरीला १००० ते १३०० रुपये क्विंटल दरम्यान दर मिळाला. उडिदाची आवक २ ते ८ क्विंटल दरम्यान राहिली. उडिदाला ४ हजार ते ६५०० रुपये क्विंटल दरम्यान दर मिळाला. हरभऱ्याची आवक २ ते ११ क्विंटल दरम्यान झाली. हरभऱ्याला ३५०० ते ५५५१ रुपये क्विंटल दरम्यान दर मिळाला. मुगाची आवक ६ ते ३८ क्विंटल दरम्यान राहिली. मुगाला ३५०० ते ६५०० रुपये क्विंटल दर मिळाला. मक्याची आवक १२ ते १५ क्विंटल झाली. मक्याचे दर १००० ते १२३० रुपये क्विंटल राहिले. तुरीची आवक गत आठवड्यात तीन वेळा झाली. २ ते ३ क्विंटल दरम्यान आवक झालेल्या तुरीला ३५०० ते ५५०० रुपये क्विंटल दर मिळाला. ज्वारीची आवक १५ ते ७१ क्विंटल दरम्यान झाली. ज्वारीचे दर १३०० ते २३०० रुपये  क्विंटल दरम्यान राहिले. नव्या बाजरीची २४ सप्टेंबरला एकदाच आवक झाली. या नव्या बाजरीला १४०० रुपये क्विंटल दर मिळाला होता. उडीद व मुगाच्या आवकेचे प्रमाण नगण्य असून मुगाचा हंगाम संपल्यात जमा आहे. उडिदाची आवकही अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. नव्या मका आवकेची प्रतीक्षा असून बाजार समितीत गत रब्बी हंगामातील ज्वारी, हरभऱ्यासह गत हंगामातील तुरीची कमी-अधिक प्रमाणात आवक होत आहे. त्यांचे दर जवळपास स्थिर असल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT