हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला १५०० ते २००० रुपये दर
हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला १५०० ते २००० रुपये दर  
बाजारभाव बातम्या

हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला १५०० ते २००० रुपये दर

टीम अॅग्रोवन

परभणी ः  येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.१४) हिरव्या मिरचीची ५० क्विंटल आवक होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला १५०० ते २००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. पालेभाज्यांमध्ये मेथीच्या २५ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकड्याला २५० ते ४०० रुपये दर मिळाले. पालकाची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ७०० ते १००० रुपये दर मिळाले. शेपूची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ७०० ते १००० रुपये दर मिळाले. चुक्याची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. कोथिंबीरची १२५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला ७०० ते १००० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यामध्ये शेवग्याची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. वाटाण्याची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३५०० रुपये दर मिळाले. गवारीची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५००० ते ६००० रुपये दर मिळाले. वालाची ५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. चवळीची ५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले. वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. कारल्याची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला २००० ते २५०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. काकडीची ३० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला ६०० ते १२०० रुपये दर मिळाले. गोल भोपळ्याची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५०० ते १००० रुपये दर मिळाले. वांग्याची ४५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. टोमॅटोची २५०० क्रेट आवक होऊन प्रतिक्रेटला ४० ते ६० रुपये रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला १५०० ते २००० रुपये दर मिळाले. भेंडीची १५ क्विंटल आवक होती. भेंडीला प्रतिक्विंटलला २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४०० ते ६०० रुपये दर मिळाले.  कोबीची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ३०० ते ५०० रुपये मिळाले. कंद वर्गीय भाज्यांमध्ये बीटरुटची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. मुळ्यांची १० हजार नग आवक होऊन शेकडा २०० ते ३०० रुपये दर मिळाले. गाजराची ५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५०० ते १००० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची २० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला ६०० ते १२०० रुपये दर मिळाले. लिंबांची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

Agriculture Irrigation : भामा-आसखेडच्या आवर्तनाची प्रतीक्षा

Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

SCROLL FOR NEXT