ginger Rs 2600 to 5000 per quintal in Jalgaon
ginger Rs 2600 to 5000 per quintal in Jalgaon  
बाजारभाव बातम्या

जळगावात आले २६०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.२८) आल्याची २१ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २६०० ते ५००० रुपये दर मिळाला. आवक औरंगाबाद, मध्य प्रदेश, यावल परिसरातून होत आहे. आवक स्थिर असून, दरही टिकून आहेत. 

बाजारात हिरव्या मिरचीची ३१ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाला. बिटला प्रतिक्विंटल १५०० ते २२०० रुपये दर मिळाला. लिंबांची पाच क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर होता. भरताच्या वांग्यांची ३१ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपयांपर्यंत मिळाले. शेवग्याची दीड क्विंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंटल १९०० ते २५०० रुपये दर मिळाला. 

गवारीची अडीच क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १८०० ते ४२०० रुपये मिळाला. बटाट्याची २५० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १३०० ते १८०० रुपये दर होता. डाळिंबांची २० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २६०० ते ५४०० रुपये दर मिळाला. बिटची सहा क्विंटल आवक झाली. पालकाची दोन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १२०० रुपये मिळाला. गाजराची आठ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १००० ते १८००० रुपये दर मिळाला.  

कोबीची २० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ११०० ते २००० रुपये मिळाला. काटेरी, लहान वांग्यांची २५ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल ७०० ते १३०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची नऊ क्विंटल आवक झाली. ५०० ते ११०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मेथीची आठ क्विंटल आवक झाली. मेथीस प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये दर होता. भेंडीची १६ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये मिळाला. टोमॅटोची १५ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १३०० ते १९०० रुपये मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT