गवार
गवार  
बाजारभाव बातम्या

कोल्हापुरात गवार, मटार तेजीत

Raj Chougule

कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात गवार, मटारचे दर तेजीत राहिले. गवारीस दहा किलोस २१० ते ३०० रुपये दर मिळाला. मटारला दहा किलोस ३०० ते ४५० रुपये दर मिळाला. सप्ताहात टोमॅटोची दररोज अठराशे ते दोन हजार कॅरेट इतकी आवक झाली. वांग्याची दररोज तीनशे ते चारशे करंड्या आवक होती.  वांग्यास दहा किलोस ६० ते २८० रुपये दर मिळाला. ओली    मिरचीची दररोज दोनशे ते तीनशे पोती आवक झाली. ओल्या मिरचीस दहा किलोस १०० ते २७० रुपये दर मिळाला. सप्ताहात टोमॅटो, कोथिंबिरीच्या आवकेत वाढ झाल्याने दर तेजीत राहू शकले नाहीत. टाेमॅटोची दररोज दीड ते दोन हजार कॅरेट आवक झाली. परतीच्या पावसानंतर बेळगाव सीमाभागात लागवड झाली. त्यानंतर सध्या टोमॅटेच्या अावकेत थोडी थोडी वाढ होत अाहे. सप्ताहात कोथिंबिरीचे दर स्थिर न राहू शकल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. गेल्या महिनाभराच्या कालावधीत कोथिंबिरीच्या लागवडीत मोठी वाढ झाली. सध्या ही कोथिंबीर बाजार समितीत येत आहे. अचानक कोथिंबिरीची आवक झाल्याने व्यापाऱ्यांनीही येईल तितकी कोथिंबीर घेण्यास असमर्थता व्यक्त केली. याचा परिणाम कोथिंबिरीचे दर घसरण्यावर झाला.  कोथिंबिरीबरोबरच पोकळा, शेपू, चाकवतीच्या दरातही तेजी राहू शकली नाही. या भाज्यांना शेकडा २०० ते ३०० रुपये दर मिळाला. द्राक्षाच्या आवकेस सांगली जिल्ह्यातून सुरवात झाली आहे. गेल्या पंधरवड्यापासून द्राक्षास किलोस २० ते ५० रुपये किलो दर कायम आहे. सोलापूर भागातून बोराच्या आवकेस सुरवात झाली आहे. बोराला किलोस ३ ते ९ रुपये दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT