सोलापुरात कांदा, कोथिंबीर, मेथीला उठाव; दर तेजीत
सोलापुरात कांदा, कोथिंबीर, मेथीला उठाव; दर तेजीत 
बाजारभाव बातम्या

सोलापुरात कांदा, कोथिंबीर, मेथीला उठाव; दर तेजीत

Sudarshan Sutaar

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात कांद्यासह कोथिंबीर, मेथीला चांगला उठाव राहिला. मागणी असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या दरातील तेजी टिकून असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून  सांगण्यात आले.  बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात कांद्याची आवक रोज ४० ते ५० गाड्या अशी जेमतेम राहिली. पण मागणी असल्याने कांद्याला चांगला उठाव मिळतो आहे. गेल्या आठवड्यात त्यात किंचित सुधारणाही झाली. कांद्याची सर्व आवक स्थानिक भागातूनच झाली. कांद्याला १०० ते ४००० रुपये तर सरासरी १८०० रुपये क्विंटल दर मिळाला. या आधीच्या सप्ताहाच्या तुलनेत त्याचे दर २०० ते ४०० रुपयांच्या फरकाने वाढले. त्याशिवाय भाज्यांमध्ये कोथिंबीर, मेथीला चांगला उठाव मिळाला. भाज्यांची आवक प्रत्येकी रोज ८ ते १० हजार पेंढ्यांपर्यंत राहिला. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यासाठी १००० ते १५०० रुपये आणि मेथीला ७०० ते १००० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय टोमॅटो, वांगी, भेंडी, गवार यांनाही तसाच उठाव आणि दर मिळाला. या फळभाज्यांची आवक प्रत्येकी १० ते ५० क्विंटलपर्यंत राहिली. टोमॅटोला ३०० ते १६०० रुपये तर सरासरी १००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. वांग्यास १२०० ते ५००० रुपये तर सरासरी २२०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. भेंडीला ११०० ते ४००० रुपये तर सरासरी २५०० रुपये क्विंटल तर गवारीला १२०० ते ४२०० रुपये तर सरासरी ३००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. डाळिंबाचे दर स्थिर डाळिंबाची आवक सध्या बाजारात कमीच आहे. पण मागणी वाढली आहे. डाळिंबाचे दर या सप्ताहात बऱ्यापैकी स्थिर राहिले. डाळिंबाची आवक प्रतिदिन अर्धा ते एक टनापर्यंत राहिली. डाळिंबाला ४०० ते १३,००० रुपये तर सरासरी ३००० रुपये क्विंटल असा दर मिळाल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT