Carrots, Cucumbers in Solapur, Lemon lift; Rates improved 
बाजारभाव बातम्या

सोलापुरात गाजर, काकडी, लिंबाला उठाव; दर सुधारले

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गाजर, काकडी आणि लिंबाला चांगला उठाव मिळाला. त्यांचे दरही सुधारल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गाजर, काकडी आणि लिंबाला चांगला उठाव मिळाला. त्यांचे दरही सुधारल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गाजराची प्रतिदिन प्रत्येकी ५ ते ७ क्विंटल, काकडीची १० ते १५ क्विंटल आणि लिंबांची २० ते ३० क्विंटल आवक राहिली. त्यांची सर्व आवक स्थानिक भागातूनच झाली. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने त्यांच्या मागणीत वाढ होत आहे. त्या तुलनेत आवक नसल्याने दरात तेजी राहिल्याचे सांगण्यात आले.

गाजराला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये, काकडीला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये, तर लिंबाला किमान १८०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये दर मिळाला. 

त्याशिवाय सिमला मिरची, वांग्यांना मागणी राहिली. त्यांची आवक प्रत्येकी ५० ते १०० क्विंटलपर्यंत राहिली. सिमला मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये, तर वांग्यांना किमान १००० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये दर मिळाला. भाज्यांमध्ये मेथी, शेपूला आणि कोथिंबिरीला पुन्हा उठाव मिळाला. या भाज्यांची आवक प्रत्येकी १० ते १५ हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. मेथीला शंभरपेंढ्यासाठी ६०० ते १२०० रुपये, शेपूला ३०० ते ५०० रुपये आणि कोथिंबिरीला ७०० ते १००० रुपये असा दर मिळाला.

डाळिंबांच्या दरात सुधारणा

डाळिंबांची आवक गेल्या काही दिवसांपासून पुन्हा घटते आहे. आवक कमी राहिल्याने दरात सुधारणा झाली आहे. प्रतिदिन ३०० ते ५०० क्विंटल अशी आवक आहे. डाळिंबांची आवक स्थानिक भागातूनच झाली. त्यां प्रतिक्विंटलला किमान ८०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक १२००० हजार रुपये असा दर मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

Gokul Milk : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; आता ‘गोकुळ’ निशाण्यावर

Jalgaon Assembly Election Result 2024 : खानदेशात महायुतीची मुसंडी; काँग्रेसचे दिग्गज पराभूत

SCROLL FOR NEXT