brinjal 1600 to 2000 rupees per quintal in Jalgaon
brinjal 1600 to 2000 rupees per quintal in Jalgaon 
बाजारभाव बातम्या

जळगावात भरताची वांगी १६०० ते २००० रुपये

टीम अॅग्रोवन

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. १) भरताच्या वांग्यांची ३१ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १६०० ते २००० रुपयांपर्यंत मिळाले. आवक जळगाव, भुसावळ, यावल परिसरातून होत आहे. आवक स्थिर असून, दरही टिकून आहेत. 

बाजारात शेवग्याची दीड क्विंटल आवक झाली. त्याच्या शेंगांना प्रतिक्विंटल १८०० ते २५०० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची ३१ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाला. बिटला प्रतिक्विंटल १५०० ते २२०० रुपये दर मिळाला. लिंबांची पाच क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर होता. आल्याची १८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २४०० ते ५२०० रुपये दर मिळाला.

गवारीची अडीच क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १८०० ते ४२०० रुपये मिळाला. बटाट्याची २५० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १३०० ते १८०० रुपये दर होता. 

भेंडीची १६ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये मिळाला. टोमॅटोची १५ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १३०० ते १९०० रुपये मिळाला. कोबीची २० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ११०० ते २००० रुपये मिळाला. काटेरी, लहान वांग्यांची २५ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल ७०० ते १३०० रुपये दर मिळाला. 

कोथिंबिरीची नऊ क्विंटल आवक झाली. ५०० ते ११०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मेथीची आठ क्विंटल आवक झाली. मेथीस प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये दर होता. 

डाळिंबांना २६०० ते ५४०० रुपये

डाळिंबांची २० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २६०० ते ५४०० रुपये दर मिळाला. बिटाची सहा क्विंटल आवक झाली. पालकाची दोन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १२०० रुपये मिळाला. गाजराची आठ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १००० ते १८००० रुपये दर मिळाला, अशी माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT