In Aurangabad, potatoes cost Rs 2,000 to Rs 2,400 per quintal
In Aurangabad, potatoes cost Rs 2,000 to Rs 2,400 per quintal 
बाजारभाव बातम्या

औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ८) बटाट्याची ४०० क्विंटल आवक झाली. त्यांना २००० ते २४०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळा ला , अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी डाळिंबांची ९२ क्विंटल आवक झाली. त्यांना १००० ते ३५०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. १२ क्विंटल आवक झालेल्या पेरूचे दर ७०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. मोसंबीची आवक १२ क्विंटल, तर दर १५०० ते ३००० रुपये प्रति क्विंटल राहिले. ७ क्विंटल आवक झालेल्या कारल्याचे दर १००० ते १५०० रुपये प्रति क्विंटल राहिले. ढोबळ्या मिरचीची आवक ३ क्विंटल, तर दर २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ५ क्विंटल आवक झालेल्या चवळीला १५०० ते २००० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. 

दुधी भोपळ्याची आवक ६ क्विंटल, तर दर ६०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. हिरव्या मिरचीची आवक ५८ क्विंटल, तर दर २००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ६०९ क्विंटल आवक झालेल्या कांद्याला २०० ते ७०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. फ्लॉवरची आवक २७ क्विंटल, तर दर ७०० ते १००० रुपये प्रति क्विंटल राहिला. ९१ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोला ५०० ते २५०० रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळाला. वांग्याची आवक ४ क्विंटल, तर दर २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. 

चार क्‍विंटल आवक झालेल्या गवारीला ३००० ते ४००० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. काकडीची आवक २५ क्विंटल, तर दर ५०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. १८ क्विंटल आवक झालेल्या भेंडीला १००० ते १४०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. कोबीची आवक ३५ क्विंटल, तर दर ३०० ते ६०० रुपये प्रति क्विंटल राहिले. १३ क्विंटल आवक झालेल्या लिंबांना ६०० ते ८०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला.

मेथी ५०० ते ८०० रूपये शेकडा

मेथीची आवक ७७०० जुड्यांची झाली. तर दर ५०० ते ८०० रुपये प्रति शेकडा राहिले. ८३०० जुड्यांची आवक झालेल्या पालकाला ४०० ते ६०० रुपये प्रति शेकडा दर मिळाले. कोथिंबिरीची आवक ११३०० जुड्या झाली. तिला ५०० ते ७०० रुपये प्रति शेकडाचा दर मिळाला. ७ क्विंटल आवक झालेल्या शेवग्याला २००० ते २८०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : उद्यापासून पावसाची स्थिती काय राहील? राज्यातील बहुतांशी ठिकाणी ऊन आणि पावसाचा अंदाज

Kharif Review Meeting : पेरण्याआधी बियाणे, खते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

Earthquake Migration : लोकप्रतिनिधींची मागणी, फरफट सर्वसामान्यांची

Fodder shortage : नाशकात चाऱ्या टंचाईवरून विरोधाभास? पशुपालकांची चिंता; प्रशासन निर्धास्त

Golden Jubilee : मातीच्या सन्मानाने ‘स्वराज ट्रॅक्टर्स’चा सुवर्ण महोत्सव साजरा

SCROLL FOR NEXT