Gondia News : तरुणांसह आबालववृद्धांना आज मोबाइलचे जणू व्यसन लागले आहे. ही बाब लक्षात घेता सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथे ग्रामविकास युवक-युवती मंचने श्रमदान करण्यासोबतच एक दिवस मोबाईलमुक्त पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
गावखेड्यासह शहरातील युवापिढी मोबाइलाच्या आहारी गेली आहे. लहान मुलांना देखील याचे जणू व्यसन लागले आहे. त्यामुळेच दिड जीबी आणि अख्खा गाव बिझी असे उपरोधिकपणे म्हटले जाते.
डव्वा गावातील युवकांनी मात्र आपली ऊर्जा सामाजिक कार्य आणि ग्रामविकासासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरीता ग्रामविकास युवक-युवती विकास मंचची स्थापना करण्यात आली आहे.
गावातील सामाजिक, सांस्कृतिक व विविध अभियानात याद्वारे सहभागी होण्याचा संकल्प या युवकांनी केला आहे. पहिल्या टप्प्यात गावात श्रमदान केले जाणार आहे. त्या माध्यमातून गाव स्वच्छ केले जाईल. दर रविवारी हा उपक्रम राबविण्याचे प्रस्तावीत आहे. याच दिवशी हे युवक मोबाइलमुक्त डे पाळणार आहे. तसा संकल्प देखील त्यांनी केला आहे.
युवकांनी ग्रामस्वच्छता व मोबाइलमुक्तीसाठी घेतलेल्या या पुढाकाराचे सरपंच योगेश्वरी चौधरी यांनी कौतुक केले. ग्रामविकासात युवकांचा जास्तीत जास्त सहभाग घेणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यासाठी विशेष सभेच्या माध्यमातून युवकांना स्मार्ट ग्राम अभियान तसेच माझी वसुंधरा अभियान याची माहिती देण्यात आली. उपसरपंच सुनील धासले, सदस्य लीलेश्वर रहांगडाले व इतरांची उपस्थिती होती.
मंचमध्ये यांचा सहभाग
आचल शहारे, मनीषा चाकाटे, सेजल गाते, शीतल रहांगडाले, सावनी येवले, पूर्वा पटले, भेरसिंग पटले, क्षपदी शालोम भेंडारकर, रमेंद्र पटले, अजिंक्य वडगावे, तुषार गोस्वामी, सचिन भोंडे यांचा विकास मंचमध्ये सहभाग आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.