Malegaon Sugar Agrowon
ताज्या बातम्या

Malegaon Sugar : ‘माळेगाव’च्या देदीप्यपान यशात कामगारांचा मोलाचा वाटा

Team Agrowon

Pune News : ‘माळेगाव’ने उसाचे गळीत आणि उपपदार्थ निर्मितीमध्ये गेली दोन वर्षांत उच्चांक प्रस्थापित केला आणि त्यामुळे प्रशासनाला ऊस दरात आघाडी घेता आली.

कामगारांना वेतनवाढीत देऊ केलेली साडेसात हजार फरकाची रक्कम, हार्वेस्टर खरेदीला प्रोत्साहनपर देऊ केलेले ३५ लाख रुपयांचा अॅडव्हान्स, सभासदांना मेडिक्लेमचा १६ कोटींचा फायदा, डिस्टलरी प्रकल्पाची नव्याने उभारणी आणि त्याच कामाची दखल घेऊन ‘व्हीएसआय’ संस्थेने माळेगाव कारखान्याचा दरम्यानच्या कालावधीत गौरव केला.

हे कार्य खरेतर बाळासाहेब तावरे यांच्या आधिपत्याखाली व संचालक मंडळ, कामगारांना बरोबर घेऊन यशस्वी केल्याचे मला समाधान वाटते, असे मत सेवानिवृत्त कार्यकारी संचालक (एमडी) राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केले.

माळेगावच्या प्रगतीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, चंद्रराव तावरे यांचेही मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक पदावरून राजेंद्र जगताप हे सेवानिवृत्त झाले.

त्यांच्याबरोबर वित्तविभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम जगताप यांच्यासह ४२ कर्मचारी ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्या प्रसंगी आयोजित निरोप समारंभात मावळते कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप बोलत होते.

या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सागर जाधव, संचालक मदनराव देवकाते, योगेश जगताप, दत्तात्रेय येळे, राजेंद्र ढवाण, स्वप्नील जगताप, संजय काटे, तानाजी देवकाते, प्रताप आटोळे,अधिकारी विकास फडतरे, अनिल वाबळे, कामगार प्रतिनिधी सुरेश देवकाते, शेखर जगताप, विनोद तावरे, राजेंद्र तावरे, प्रमोद खलाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

‘माळेगाव’चे सन्मानार्थी निवृत्त कर्मचारी

श्रीहरी येळे, सोपान आटोळे, लतिब सय्यद, सत्यवान जगताप, रवींद्र जगताप, लालासाहेब तावरे, भीमराव वाघ, सूर्यकांत धुमाळ, गजानन जगताप, सुभाष डोंबाळे, ज्ञानदेव शेंडगे, बापूराव कोकरे, राजेंद्र जाधव, शामराव माळवदकर, राजेंद्र धुमाळ, प्रकाश धायगुडे, बाळासाहेब भोईटे, शरद जगताप, शिवाजी काळे, शंकर धायगुडे, सिराज पठाण, सोपान मारकड, मधुकर तावरे, सत्यवान जगताप, प्रमोद चोपडे, सुभाष भोसले, रवींद्र ढवाण, काशिनाथ कुंभार, शंकर कांबळे, रामदास खोमणे, सोपान बागाव, मोहन चव्हाण, कालिदास जगताप, सुभाष येळे, जयवंत लोणकर, लक्ष्मण नाझिरकर, सुहास गावडे, मोहन भरणे, प्रकाश येळे, हरिश्‍चंद्र वदक.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT