Malegaon Sugar Mill : माळेगाव देणार साखर कामगारांना वेतन वाढीतला फरक

माळेगाव सहकारी साखर कारखाना कामगारांना वेतनवाढ फरकाची साडेसात कोटी रुपयांची रक्कम दोन टप्प्यांत देणार आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यातील सुमारे साडेतीन कोटी रुपये लागलीच कामगारांच्या बॅंक खात्यावर वर्ग केले जाणार आहे.
Sugar Mill
Sugar MillAgrowon

माळेगाव, ता. ४ : माळेगाव सहकारी साखर कारखाना (Malegaon Co-operative Sugar Factory) कामगारांना वेतनवाढ फरकाची साडेसात कोटी रुपयांची रक्कम दोन टप्प्यांत देणार आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यातील सुमारे साडेतीन कोटी रुपये लागलीच कामगारांच्या बॅंक खात्यावर वर्ग केले जाणार आहे.


कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष सागर जाधव, कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप यांनी सोमवारी (ता. ३) संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय जाहीर केला.

इतर कारखान्यांच्या तुलनेत माळेगाव कारखान्याने फरकाची रक्कम दोन टप्प्यांतच देण्याचे सर्वप्रथम जाहीर केल्याने येथील कामगारांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले.

त्यामध्ये कामगार नेते विनोद तावरे, सुरेश देवकाते, चंद्रशेखर जगताप, अशोक देवकाते, राजेंद्र जगताप, हनुमंतराव देवकाते, सुभाषराव देवकाते, धनंजय शिंदे, भीमराव आटोळे, अरुण पाटील, बापूराव कोकरे आदी कामगारांचा समावेश होता.

Sugar Mill
Malegaon Sugar Factory : माळेगाव साखर कारखान्याचा ३१९ कोटींचा प्राप्तिकर माफ

दरम्यान, १ एप्रिल २०१९ मध्ये शासनस्तरावर स्थापन झालेल्या त्रिपक्षीय कमिटीने साखर कामगारांना १२ टक्के वेतनवाढ निश्चित केली होती. त्यानुसार १ एप्रिल २०१९ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीमधील माळेगाव कारखान्याच्या कामगारांचा वेतनवाढीमधील फरक साडेसात कोटी रुपये इतका निघाला होता.

ही रक्कम अदा करण्याबाबत सोमवारी संचालक मंडळाची बैठक झाली. त्यामध्ये फरकाची रक्कम दोन टप्प्यात देण्याचे निश्चित झाले व पहिला साडेतीन कोटींचा टप्पा लागलीच कामगारांच्या बॅंक खात्यावर वर्ग करण्याचे ठरले.

Sugar Mill
Sugar Industry : ‘माळेगाव’ उभारणार पाच कोटींचे साखर गोडाउन

माळेगाव कारखाना प्रशासनाने ३० नोव्हेंबर २०२१ नंतरच्या कालावधीत त्रिपक्षीय कमिटीने ठरवून दिलेली १२ टक्के वेतनवाढ नियमितपणे अदा केली जात आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले.


दरम्यान, सोमेश्वर कारखान्याने कामगारांना वेतनवाढीमधील फरकाची रक्कम तीन टप्प्यात देण्याचे निश्चित केले आहे. त्यापैकी पहिला टप्पा याअगोदरच दिला आहे.

माळेगाव कारखान्याचे प्रशासन सभासद व कामगारांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करीत आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे, सभासदांना एफआरपीपेक्षा अधिकचा अंतिम ऊस दर देणे, कामगारांना १२ टक्के वेतन वाढ, रजेचा पगार आणि सर्वाधिक बोनसची परंपरा कायम ठेवणे आहे.

यापुढील काळात कारखान्यामध्ये ऊस गाळप उच्चांक करणे, उपपदार्थ निर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालून लक्षवेधी उत्पादन निर्माण करण्याचा कामगारांचा निर्धार आहे.
- सुरेश देवकाते, कामगार नेते

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com