MGNREGA
MGNREGA  Agrowon
ताज्या बातम्या

MGNREGA : गावसमृद्धीसाठी ‘मनरेगा’त काम करा

Team Agrowon

पारोळा, जि. जळगाव : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही गाव समृद्ध करणारी असून, प्रत्येक गावकऱ्याने यात सहभाग घेतला तर निश्‍चितपणे आपले स्वप्न साकार होऊन गाव समृद्ध होईल. शिरसोदे व बहादरपूर गावाला दहा वर्षांत ‘मनरेगा’तून २६४ प्रकारची कामे करता येणार आहेत, असे प्रतिपादन रोजगार हमी योजना व इतर मागास बहुजन कल्याणचे राज्याचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांनी केले.

बहादरपूर व शिरसोदे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मनरेगा योजनेअंतर्गत गावसभा व मनोजालय फाउंडेशनच्या कोनशिला अनावरण, रस्त्याचे भूमिपूजन व रस्ता कॉँक्रिटीकरणाच्या उद्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते.

‘रोहयो’चे सहायक संचालक (मुंबई) विजयकुमार कलवले हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. बहादरपूरचे सरपंच भिकन पारधी, शिरसोदे सरपंच रमेश सैंदाणे अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, राज्य प्रकल्प अधिकारी (मंत्रालय) धनंजय तिगोटे, राज्य समन्वयक (मंत्रालय) अमित गवळी, राज्य समन्वयक (मंत्रालय) नीलेश घुगे, राज्य समन्वयक (मंत्रालय) प्रवीण सुतार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, गटविकास अधिकारी मनोज धांडे, नागपूरचे राज्य समन्वयक थवे भुते, नायब तहसीलदार श्री. उगले, गटविकास अधिकारी विजयकुमार लोंढे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी, विस्ताराधिकारी आर.

डी. इंगळे, मनोजालय फाउंडेशनचे अध्यक्ष विजय मिस्तरी यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या वेळी मनोजालय फाउंडेशनच्या जनकक्ष कार्यालय व कोनशिलेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिरसोदे व बहादरपूर या दोन गावांच्या समावेश दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखड्यात करण्यात आला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बहादरपूर गावाला ३४ कोटी १४ लाख तर शिरसोदे गावाला ४९ कोटीची कामे दहा वर्षांत करावयाची आहे. सूत्रसंचालन आर. पी. बडगुजर तर राजेंद्र चौधरी यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

Indian Monsoon : पाऊसकाळ उत्तम, पुढे काय?

Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

Water Scarcity : आडातच नाही, तर...

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

SCROLL FOR NEXT