Gram Panchayat
Gram Panchayat Agrowon
ताज्या बातम्या

Gram Panchayat Tax : शंभर टक्के कर भरणाऱ्या महिलांचा पैठणी देऊन गौरव

Team Agrowon

Gram Panchayat News पिरंगुट (ता. मुळशी) ः लवळे ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) माध्यमातून विविध उपक्रम नुकतेच राबविण्यात आले. महिलांचा सन्मान, महिलांना परसबागेचे बियाणे वाटप (Seed Distribution), ‘लकी ड़्रॉ’द्वारे पैठणींचे वितरण, व्याख्यान आदी कार्यक्रम पार पडले.

तर १०० टक्के कर (Tax) भरणाऱ्या तीन महिलांचा पैठणी (Paitani Saree) देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये शोभा भगवान गरुड, सीमा गोरख राऊत व शुभांगी शाम बाणेकर यांचा समावेश होता.

या वेळी ग्रामपंचायतीच्या वतीने परस बागेच्या बियाणांच्या १०० पाकिटांचे वाटप उपस्थित महिलांना करण्यात आले. त्यानंतर ‘यशदा’चे व्याख्याते वामन बाजारे यांनी उपस्थित महिलांना परसबाग, पर्यावरण तसेच आरोग्य विषयाचे मार्गदर्शन केले.

तसेच चालू आर्थिक वर्षासह १०० टक्के कर भरणाऱ्या तीन भाग्यवान गृहिणींना ‘लकी ड़्रॉ’द्वारे पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले.

कर संकलनाकरिता प्रोत्साहन मिळावे आणि गावातील प्रत्येक कुटुंबाने ग्रामपंचायतीचा कर भरण्यासाठी चर्चा होऊन त्यास चळवळीचे स्वरूप द्यावे, या उद्देशाने जागतिक महिला दिनानिमित्त हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला होता.

सरपंच नीलेश गावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तर संदीप जठार, व्ही. एन. भोर, गणेश तांदळे, सोपान ठकोरे, चंद्रकांत शेकडे, संजय मारणे, ग्रामविकास अधिकारी व्ही. डी. साकोरे, उपसरपंच रंजित राऊत, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. कार्यकर्माचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजी सरपंच व विद्यमान सदस्य संजय सातव यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT