Khilar Breed Agrowon
ताज्या बातम्या

Khilar Breed : खिलार ‘लखपती’च

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : राज्यभर बैलगाडा शर्यतींचा जोर सुरू असल्याने खिलार बैलांना मागणी कायम आहे. सर्वोच्च न्यायालयानेही नुकताच शर्यतींना परवानगी देण्याचा निर्णय कायम ठेवला, परिणामी शर्यत शौकिनांमध्ये उत्साह द्विगुणित झाला आहे.

याचा थेट परिणाम खिलार बैलांचे दर आणखी वाढण्यावर होणार आहे. पूर्ण वाढ झालेल्या तयार बैलांना तर लाखो रुपयांचा भाव आहेच, याच बरोबर अगदी पाच ते सहा महिन्यांच्या खिलारच्या वासरासही एक लाख रुपयापर्यंत दर मिळत आहे.

सहा महिन्यांपर्यंतची वासरे विकत घ्यायची, त्याची तीन ते चार महिने चांगली जोपासना करायची आणि त्याची जादा किमतीने विक्री करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव कमी झाल्याने सध्या जनावरांच्या बाजारातील उलाढाल वाढली आहे. यात खिलार जातीच्या बैलांच्या उलाढालीचा अधिक वाटा आहे. बाजारात एक बैल किमान तीन ते चार लाख रुपयांना विकला जात आहे.

जत्रा- यात्रांच्या हंगामामुळे दररोज कुठेना कुठे तरी शर्यती सुरूच आहेत. केवळ यात्रा- जत्राच नव्हे, तर स्थानिक पातळीवरील राजकीय नेत्यांच्या वाढदिवसानिमित्तही अशा शर्यतीचे आयोजन होत असल्याने आता शर्यतीसाठीचा विशेष हंगाम राहिला नाही.

परिणामी, वर्षभर शर्यती होतच आहेत. यामुळे शौकिनांना दररोज बैलांची गरज आहे. एखादा बैल जखमी झाल्यास तातडीने दुसऱ्या बैलाचा शोध सुरू असल्याने सांगेल त्या किमतीला बैलाची खरेदी होत आहे. शर्यतीस तयार बैलांना लाखो रुपयांची बोली लागत आहे.

शर्यतीसाठीची बैलजोडी बनतेय ‘पॅशन’

ग्रामीण भागातील युवा वर्गामध्ये शर्यतींचे मोठे आकर्षण आहे. लाखो रुपयांच्या बक्षिसाबरोबरच किमती दुचाकी, चार चाकी गाड्या, ट्रॅक्टरही बक्षिसाच्या रूपाने मिळत आहेत. यामुळे युवा वर्ग ही शर्यतीच्या बैलांच्या संगोपनाकडे वळत आहे.

याचा साहजिकच परिणाम बैलांच्या किमती वाढण्यावर होत आहे. एकीकडे शर्यतीच्या बैलांना मागणी वाढत असली तरी शेतीकामासाठी बैल घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल अत्यंत कमी असल्याचे जनावरे बाजारातील व्यापारी सूत्रांनी सांगितले.

गो शाळेकडेही सातत्याने विचारणा

जशी ग्रामीण भागात बैलांसाठी चौकशी सुरू आहे. तशी राज्यातील गो शाळांकडेही चौकशी वाढत आहे. काही महिन्यांपूर्वी चार ते पाच महिन्यांच्या वासरास केवळ पाच ते दहा हजार रुपये इतकीच किंमत येत होती.

अलीकडे ही किंमत ७५ हजार ते एक लाख रुपयांच्या दरम्यान जात असल्याची माहिती गो शाळाचालकांनी दिली. वासरांच्या चौकशीसाठी गो शाळा प्रमुखांकडे दररोज मोठ्या प्रमाणात विचारणा होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT