Agriculture Credit
Agriculture Credit  Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Credit : कृषी पतपुरवठा संस्थांचे संगणकीकरण करणार

टीम ॲग्रोवन

मुंबई : राज्यातील १२ हजार कृषी पतपुरवठा संस्थांच्या (Agriculture Credit Institution) संगणकीकरण योजनेच्या (Computerization Scheme) अंमलबजावणीस मान्यता देण्यात आली. ही योजना केंद्र सरकार पुरस्कृत असून त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करणार आहे.

देशभरात ६३ हजार सहकारी सेवा संस्थांचे संगणकीकरण करण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. यासाठी राज्य सरकार एकूण खर्चाच्या ४० टक्के भार उचलणार आहे. या योजनेअंर्तगत पुढील पाच वर्षांत म्हणजे २०२६-२७ पर्यंत संगणकीकरण करण्यात येणार आहे. या योजनेचा १२ हजार सहकारी संस्थांचे संगणकीकरण करण्यात येणार असून या आर्थिक वर्षात चार हजार संस्थांचे संगणकीकरण अपेक्षित आहे.

या योजनेसाठी राज्याच्या हिश्याची १५६ कोटी, ५५ लाख रक्कम २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. २०२२-२३ या वर्षासाठी ५१ कोटी, ८ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात येतील.

नाबार्डच्या पुढाकाराने राज्यातील ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकामध्ये सीबीएस संगणक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. तथापी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाना संलग्न असलेल्या बहुतांश सेवा सहकारी संस्थामध्ये अद्यापही संगणक प्रणाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि सभासदांना विविध प्रकारच्या सेवा सक्षमपणे पुरविण्यासाठी ही सेवा उपयोगी ठरण्याची शक्यता आहे.

जिल्हास्तरावर समिती

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सहकार विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहे.

योजनेचा उद्देश

सेवा संस्थांच्या संगणकीकरणामुळे संस्थांची कार्यक्षमता वाढविणे, उत्तरदायित्व आणि पारदर्शकता आणणे, नफा क्षमता वाढविणे, कार्यपद्धतीनेच प्रमाणीकरण करणे, एकसमान लेखा पद्धतीचा अवलंब करणे आदी उद्देश आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा पातळीवर समित्या स्थापन करण्यात येणार आहे.

नाबार्डमार्फत होणार अंमलबजावणी

केंद्रीय सहकार विभागाच्या समन्वयाने राज्याचा सहकार विभाग आणि नाबार्डमार्फत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नाबार्ड या योजनेत मार्गदर्शन आणि दिशानिर्देश देणार आहे. १२ हजार पैकी चार हजार संस्थांचे संगणकीकरण करण्याचे उद्दिष्ट या वर्षात ठेवले आहे.

अशी असेल राज्य समिती

अध्यक्ष : सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव सदस्य : वित्त विभागाचे प्रधान सचिव, नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक, तीन जिल्हा बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी. सदस्य सचिव : राज्य सरकारी बँकेचे कार्यकारी संचालक

जिल्हा समिती

अध्यक्ष : जिल्हाधिकारी

सदस्य: जिल्हा विकास व्यवस्थापक, नाबार्ड

जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी

विकास सेवा संस्थांचे प्रतिनिधी

सदस्य सचिव : जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT