Girna Dam
Girna Dam Agrowon
ताज्या बातम्या

गिरणा धरणाच्या कालव्यांसह पाटचाऱ्यांची दुरुस्ती कधी?

टीम ॲग्रोवन

जळगाव ः खानदेशात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गिरणा नदीवरील गिरणा धरणाचा (Girana Dam) मोठा उपयोग रब्बी, शिवार ओलिताखाली (Irrigation) आणण्यास होऊ शकतो, परंतु पाटचाऱ्या, वितरिकांची दैना झाल्याने लाभक्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी या रब्बीतही पोचेल का, असा प्रश्न आहे.

१८.४८ टीएमसी एवढी साठवण क्षमता या धरणात आहे. हे धरण तीन वर्षे १०० टक्के भरले आहे. हे धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात आहे. परंतु त्याचा अधिकचा उपयोग जळगाव जिल्ह्यात होतो. गिरणा पट्ट्यात चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव या तालुक्यांसाठी हे धरण उपयुक्त आहे.

शिवाय गिरणा कालव्यांच्या मदतीने नदीजोड प्रकल्प राबविण्यात आला असून, यामुळे पारोळा, एरंडोल तालुक्यातील मध्यम, लघू प्रकल्पातही पाणी पोहोचविता येते. २१ हजार हेक्टर क्षेत्राला या धरणाचा उपयोग होतो, असे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे. परंतु भडगाव, पाचोरा भागात अनेक गावांमधील शिवारात पाणी पोहोचत नाही. वितरिका, पाटचाऱ्यांमधून पाणी पुढे सरकत नाही.

काटेरी झुडपे, नादुरुस्त यंत्रणा यामुळे पाणी शिवारात व्यवस्थितपणे व हव्या त्या गतीने जात नाही. अनेकदा शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचते. त्यात नुकसान होते. यासंदर्भात भडगाव, पाचोरा भागांतील शेतकरी, लोकप्रतिनिधींनी शासन, स्थानिक आमदार यांच्याकडे मागणी केली आहे. परंतु दुरुस्ती केली जात नाही. सुमारे २० वर्षे पाटचाऱ्या, व्हॉल्व्ह व इतर यंत्रणांची दैनावस्था झाली आहे. रब्बी हंगामासाठी लवकरच पाणी आरक्षण केले जाईल. या महिन्याच्या अखेरीस रब्बीसाठी पाणी सोडण्याची तयारीदेखील होईल, पण पाटचाऱ्या दुरुस्त होतील का, हा प्रश्‍न आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

SCROLL FOR NEXT