Agriculture Department Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Recuirtment : कृषी सहायक पदभरतीचा मुहूर्त कधी निघणार

Agriculture Department : राज्यात कृषी सहायकाची पदे भरण्याबाबत १५ दिवसात कार्यवाही केली जाईल, असे विधी मंडळाच्या अधिवेशनादरम्यान कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले होते.

Team Agrowon

Akola News : राज्यात कृषी सहायकाची पदे भरण्याबाबत १५ दिवसात कार्यवाही केली जाईल, असे विधी मंडळाच्या अधिवेशनादरम्यान कृषिमंत्र्यांनी (Abdul Sattar) स्पष्ट केले होते. मात्र, अद्यापही याबाबत काही हालचाली दिसत नसल्याने या पदांसाठीचे उमेदवार प्रतीक्षेत थांबलेले आहेत. या नोकरभरतीची (Agriculture Department Recruitment) जाहिरात कधी येईल याबाबत विचारणा करीत आहेत.

कृषी खात्यात कृषी सहायकाची नोकरभरती अनेक दिवसांपासून झालेली नसल्याने कृषी पदवीधर परीक्षार्थी चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. गेल्या काळात झालेल्या विधी मंडळाच्या अधिवेशनात विधान परिषद सदस्य आ. सतीश चव्हाण यांनी प्रश्नोत्तरामध्ये कृषी सहायक पदभरतीबाबत प्रश्‍न विचारला होता.

याला उत्तर देताना तेंव्हा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी १५ दिवसात जाहिरात प्रसिद्ध करू असे सांगितले होते. यानंतर आता दीड महिना लोटला आहे. अद्यापही जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही, असे कृषी परीक्षार्थी सांगत आहेत.

राज्यातील हजारो कृषी पदविका व कृषी पदवीधारक परीक्षार्थी जाहिरातीच्या प्रतिक्षेत आहेत. मंत्र्यांनी तातडीने जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत सूचना द्यावी अशी मागणी परीक्षार्थी करीत आहेत.

आधीच कृषी विभागात सहायकांची पदे रिक्त असल्याने फिल्डवर योजना राबवताना अडचणी येत आहेत. अनेक कृषी सहायकांकडे पदभारांचे ओझे वाढलेले आहे. यामुळे कार्यरत कृषी सहायकही कंटाळले. तर दुसरीकडे नोकर भरती झालेली नसल्याने या परीक्षेसाठी तयारी करीत असलेले परीक्षार्थी प्रतिक्षा करून थकले आहेत.

पदभरतीसाठी सातत्याने मागणी तसेच पाठपुरावा केला जात आहे. विधी मंडळ अधिवेशनात मंत्र्यांनी १५ दिवसात जाहिरात निघेल असे स्पष्ट केल्यानंतर या परीक्षार्थ्यांमध्ये एकच आनंदाचे वातावरण बनले होते. दरम्यानच्या काळात परीक्षार्थी दररोज जाहिरातीची प्रतीक्षा करीत राहिले.

मात्र, अद्यापही जाहिरातीचा पत्ता नसल्याने पदभरतीचे घोडे नेमके कुठे अडले याचीच चर्चा आता त्यांच्यात होत आहे.याबाबत कुठल्याही स्तरावर परीक्षार्थ्यांना स्पष्टीकरणही मिळत नसल्याने गोची आणखी वाढलेली आहे. तातडीने पदभरती व्हावी यासाठी हे उमेदवार मागणी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Price: साखर कारखान्यांच्या नफ्यात शेतकऱ्यांचा मोठा वाटा, काय आहे उसाचा रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युला?

Agrowon Podcast: मका दर दबावातच; कापूस दर दबावातच, आल्याच्या दरात चढ उतार, उडदाचे भाव दबावात, काकडीला उठाव

Ativrushti Madat: शेती जमिनीच्या नुकसानीपोटी १५ हजार शेतकऱ्यांना मदत वाटपास मंजुरी; २४ कोटी ६३ लाखांची मदत मिळणार

Maharashtra Local Body Election: नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान, तर ३ डिसेंबरला लागणार निकाल

Pauas Andaj: काही भागात हलक्या पावसाचा अंदाज; राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT