Wheat Crop
Wheat Crop Agrowon
ताज्या बातम्या

Wheat Cultivation : जिद्दीच्या जोरावर ३५ गुंठ्यांत २० क्विंटल गव्हाचे उत्पादन

Team Agrowon

चास, ता. खेड : येथील शेतकरी सुभाष तुकाराम रासकर यांनी आधुनिकतेच्या जोरावर, तसेच योग्य नियोजन करत बहरवलेल्या ३५ गुंठ्यांत २० क्विंटल गव्हाच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. कष्ट व जिद्दीतून त्यांनी गव्हाचे भरघोस उत्पादन (Wheat Production) घेतले आहे.

वडिलोपार्जित शेतीमध्ये नानाविध प्रयोग करून आपली शेती आधुनिक पद्धतीने करण्यावर जोर देत रासकर यांनी कष्टाला जिद्दीची जोड देत गेल्या काही वर्षात भरघोस उत्पन्न नानाविध पिकामधून घेतले आहे.

गव्हाच्या पिकाबाबत बोलताना रासकर म्हणाले, की विशेष सांगायचे म्हणजे नोव्हेंबर २०२२ च्या सुरवातीस केवळ ३५ गुंठे क्षेत्रावर वर्धमान कृषी सेवा केंद्र, चासमधून गव्हाचे बियाणे घेत पेरणी केली.

खते, पाणी आणि कोणत्याही प्रकारच्या रोगाची मात्रा होऊ नये म्हणून औषधांची फवारणी यांचे योग्य नियोजन केले. गव्हाच्या उगवणीनंतर थंडीचे प्रमाण कमी असल्याने पिकावर प्रतिकूल परिणाम होऊ नये म्हणून वेळोवेळी कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून पिकाचे संवर्धन केले.

दरम्यान, त्याचा परिणाम म्हणजे केवळ दोन महिन्यांच्या कालावधीत पीक जोमदार आले असून, गव्हाची एक एक ओंबी सात ते आठ इंच लांबीची असून पिकाची वाढही चांगली झाली आहे. वातावरण चांगले राहिल्यास या क्षेत्रातून वीस क्विंटल उत्पादन मिळले, अशी त्यांची ठाम अपेक्षा त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

Banana Rate : खानदेशात केळी दरात मोठी घसरण

Loksabha Election : कसबा पॅटर्नची संधी साधणार की हुकणार

Water Scarcity : पुणे विभागात पाण्यासाठी वणवण

Cotton Production : भारत कापूस उत्पादनात पडतोय पिछाडीवर

SCROLL FOR NEXT