Chhatrapati Sambhajinagar News: शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी यात्रा महोत्सवाला नाथांचे वंशज रघुनाथ बुवा गोसावी यांच्या मानाच्या पहिल्या दिंडीने सोमवारी (ता.९) उत्साहात प्रारंभ झाला. दिंडी पालखीतील नाथांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. लाखो भाविकांच्या साक्षीने गोदातीरावर ‘भानुदास-एकनाथ’चा गजर दुमदुमला..परंपरेनुसार नाथांचे राहते वाडा असलेल्या गावातील मंदिरातून विधिवत पूजन करून सोमवारी दुपारी बारा वाजता ही मानाची दिंडी मार्गस्थ झाली. राज्यातील ग्रामीण भागातून आलेल्या विविध दिंड्यांमधील वारकरी भाविकांनी या दिंडीत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ‘भानुदास-एकनाथ’ असा टाळ-मृदुंगाच्या गजरात जयघोष करत वारकरी पुढे सरकत होते. .Agriculture Festival: कृषी, धान्य महोत्सवाला अत्यल्प प्रतिसाद.मानाची ही दिंडी गावातील नाथ मंदिरापासून पिठुंबरा व भिल्लवाडा मार्गे गोदाकाठी नेण्यात आली. गोदेच्या वाळवंटात वर्षानुवर्षे यात्रेसाठी येणारे महिला-पुरुष वारकरी आणि विविध फडांमध्ये मुक्काम केलेल्या भाविकांनी या दिंडीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर दिंडी वाळवंट मार्गे नाथांच्या समाधी मंदिरात पोहोचली. येथे नाथ वंशज रघुनाथ बुवा गोसावी व भाविकांनी भजन करून समारोप केला. यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले..Nath Jalashay : गेवराईतील राक्षसभुवनचे शनी मंदिर पाण्यात.असा असतो नाथषष्ठी उत्सवनाथषष्ठी उत्सव तीन दिवस साजरा केला जातो. पहिला दिवस षष्ठी, दुसरा दिवस सप्तमी आणि तिसरा दिवस अष्टमी असा कार्यक्रम असतो. सप्तमीच्या दिवशी मध्यरात्रीनंतर छबिना पालखी काढण्यात येते. हा छबिना पहाटेपर्यंत गोदाकाठी असतो. त्यानंतर सकाळी कीर्तन करून कार्यक्रमाची सांगता केली जाते.तिसऱ्या दिवशी अष्टमीला नाथांच्या समाधी मंदिरात काल्याची दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता केली जाते. यंदाच्या यात्रेसाठी विदर्भ, मराठवाडा, खान्देश तसेच पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागांतून वारकऱ्यांच्या शेकडो दिंड्या गोदेच्या वाळवंटात दाखल झाल्या आहेत. मानाच्या दिंडीत नाथवंशज रघुनाथ महाराज गोसावी, रावसाहेब महाराज गोसावी, योगीराज महाराज गोसावी, सरदार गोसावी आदी सहभागी झाले होते..प्रारंभदिनी दिंड्यांचा ओघयात्रेच्या प्रारंभापूर्वी रविवारी रात्री उशिरापर्यंत दिंड्यांचे आगमन सुरू होते. दाखल झालेल्या दिंड्यांमधील वारकऱ्यांचे लोंढे वाढल्याने संपूर्ण शहर भाविकांनी व्यापलेले दिसत होते.धर्मशाळा, मठ व हॉटेलमधील जागा केव्हाच संपल्या.यात्रेच्या प्रारंभदिनीही दिंड्यांचे आगमन सुरूच राहिल्याने गल्ली-बोळातील मोकळ्या जागांवर फड उभारून नाथांच्या गुरुसेवा-भक्तीचे भजन, कीर्तन, भारुडे व अभंगवाणीच्या स्वरांनी संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे..वाडा मंदिरातही अलोट गर्दीसंत एकनाथ महाराज यांचा प्राचीन वाडा हे त्यांच्या त्या काळातील राहते घर मानले जाते. येथे श्रीकृष्णाने श्रीखंड्याच्या रूपात नाथांच्या घरी रांजणात पाणी भरून सेवा केल्याची आख्यायिका सांगितली जाते. तोच रांजण आजही येथे जतन करून ठेवलेला आहे. तुकाराम बीजच्या दिवशी भाविक गोदावरीतून पाणी आणून या रांजणात भरतात आणि त्यानंतर नाथषष्ठी उत्सवाला अनौपचारिक सुरवात होते. याच वाड्यात नाथांच्या पूजेतील ‘विजयी पांडुरंगा’ची मूर्तीही आहे. कालांतराने भाविकांच्या दर्शनामुळे या वाड्याला मंदिराचे स्वरूप प्राप्त झाले. गेल्या पाचशे वर्षांहून अधिक काळापासून येथे नाथषष्ठी उत्सवात मोठी गर्दी होत असून यंदाही दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.