Gokul Milk agrowon
ताज्या बातम्या

Gokul Milk : आम्हाला 'अमूल'सारखे पर्याय, 'गोकुळ'कडून जखमेवर मीठ चोळण्याचे काम

Gokul Dudh Sangh : कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक चांगल्या प्रतीच्या दुधाचा पुरवठा करूनही दूध उत्पादकांची काळजी 'गोकुळ'कडून घेतली जात नाही.

sandeep Shirguppe

Gokul Milk Kolhapur : मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून गाय दूध दरात कपात करण्यात आली. दरम्यान यावरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संतप्त होत गोकुळ कार्यालयावर मोर्चा काढला. तर करवीर, राधानगरी, भुदरगड तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला.

दरम्यान काल चंदगड तालुक्यातील अखील भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष संदीप पाटील आणि नाना इसके यांनी अन्यथा अमूलसारखे पर्याय असल्याचा थेट इशारा दिला.

यावेळी पाटील म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक चांगल्या प्रतीच्या दुधाचा पुरवठा करूनही दूध उत्पादकांची काळजी 'गोकुळ'कडून घेतली जात नाही. त्यात गाय दुधाचा दर कमी करून उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे गायीच्या दुधाची दरवाढ करा, अन्यथा 'अमूल'सारखे पर्याय खुले असल्याचा इशारा संदीप पाटील दिला.

'गोकुळ'ने गेल्या चार महिन्यांत गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर चार रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे उत्पादक हवालदिल झाले आहेत त्यामुळे संघ प्रशासनाला जाब विचारण्यासाठी बुधवारी शेतकऱ्यांनी जनावरांसह तावरेवाडी चिलिंग सेंटरवर धडक दिली.

तत्पूर्वी, चिलिंग सेंटरचे प्रमुख एस. बी. चिंडक यांना निवेदन दिले. गणपत पवार, वसंत पाटील सुभाष पाटील, संजीव पाटील, कुमार पाटील, मनोहर खणगुतकर, म्हातारू कागणकर, नितेश तेजम, जोतिबा हारकारे, राजू बोकडे, जोतिबा पाटील, नामदेव पाटील, आदी उपस्थित होते.

दरम्यान, तालुक्यातून 'गोकुळ'ला सुमारे एक लाख लिटर दूध पुरवठा होते. मात्र, संचालकंचे तालुक्याकडे लक्ष नाही. त्यामुळे उत्पादकांना न्याय न मिळाल्यास १२ ऑक्टोबरला संपूर्ण तालुक्यातून तीव्र आंदोलन उभारू असा इशाराही त्यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा सरी शक्य; उन्हाचा चटका कायम

Ratoon Sugarcane: खोडवा उसावरील एल निनोच्या उष्णतेचा ताण कसा कमी करावा?

Farmers Protest: शेतकरी अडचणीत, ऊस दर, धान खरेदी प्रश्नी राकेश टिकेत आक्रमक, मोठ्या आंदोलनाचा इशारा

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT