Udhhav Thackeray Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

पावसाने हातात काहीच उरलं नाही. मोठा खर्च करून आम्ही पिकं आणली होती. पण सगळं पीक पाण्याखाली गेलंय. आता आम्ही दिवाळी तरी कशी साजरी करायची?’’ असा उद्विग्न सवाल शेतकऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर केला.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : ‘‘पावसाने हातात काहीच उरलं नाही. मोठा खर्च करून आम्ही पिकं आणली होती. पण सगळं पीक पाण्याखाली (Crop Damage) गेलंय. आता आम्ही दिवाळी तरी कशी साजरी करायची?’’ असा उद्विग्न सवाल शेतकऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्यासमोर केला. यावर बळीराजाला धीर देताना श्री. ठाकरे म्हणाले,‘‘धीर सोडू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आता आपण रडायचं नाही लढायचं. तुम्ही तुमच्याकडे असलेला आसूड फक्त हातात घेऊ नका, तर तो वापराही,’’ असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता. २३) जिल्‍ह्यातील अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन, नुकसानीची पाहणी केली. श्री. ठाकरे यांनी दहेगाव, पेंढापूर (ता. गंगापूर) येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

श्री. ठाकरे म्हणाले, की अतिशय विचित्र अवस्थेत सध्या आपण आहोत, एका बाजूला दिवाळी सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. दिवाळी साजरी करणे तर दूरच पण घरात अन्न काय शिजवायचे, असा प्रश्न आपल्या अन्नदात्याला पडला आहे. पण सरकारचं या परिस्थितीकडे लक्ष नाही.

आपल्या उपमुख्यमंत्र्यांकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे असतात. नुकतेच पुण्यात जास्त पाऊस झाल्यावर ते म्हणाले, की पाऊस किती पडावा हे महापालिकेच्या हातात नसते. आताही राज्यभरात अतिवृष्टी झाल्यानंतर ते म्हणू शकतात, की हा पाऊस सरकारच्या हातात नसतो, असं म्हणत श्री. ठाकरे यांनी श्री. फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT