Water Supply Scheme Agrowon
ताज्या बातम्या

Water Supply : विजेअभावी १८ दिवसांपासून पाणी बंद

Electricity : सार्वजनिक पाणीपुरवठ्याची मोटार बंद पडल्याने नागरिकांना गेल्या १८ दिवसांपासून पाण्यासाठी उन्हात पायपीट करावी लागत आहे.

Team Agrowon

Pune News : तालुक्यातील शिरदाळे येथे गेल्या १८ दिवसांपासून वीजपुरवठ्यात वारंवार बिघाड होत आहे. त्यामुळे सार्वजनिक पाणीपुरवठ्याची मोटार बंद पडल्याने नागरिकांना गेल्या १८ दिवसांपासून पाण्यासाठी उन्हात पायपीट करावी लागत आहे.

पुढील दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा उपसरपंच मयूर सरडे यांनी दिला आहे.

तालुक्याच्या पूर्व भागातील उंच पठारावर असलेल्या या गावात पिण्याच्या तसेच वापरण्याच्या पाण्याचा फारसा तोटा कधी येत नाही. गावात असलेल्या गावतळ्यातून सर्वांना पुरवठा केला जातो. पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला घरपोच पाणी मिळते. वीजरोहित्रावरील (ट्रान्स्फॉर्मर) बाटला जळाल्याने तो गेल्या दहा दिवसांनंतर बसविण्यात आला.

त्यानंतर ट्रान्स्फॉर्मरची दुरवस्था झाल्यामुळे केबल जळाली. या कामांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून, भर उन्हाळ्यात पाण्यासाठी त्यांना पायपीट करावी लागत आहे. गावातील महिला, वयस्कर मंडळीची यामुळे हाल होत आहेत.

लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी वारंवार मागणी करण्यात येत आहे. ट्रान्स्फॉर्मरची दुरवस्था झाली असून, फ्यूज फुटलेले आहे. ट्रान्स्फॉर्मर शाळेच्या व गावाच्या लगत असल्यामुळे एखादी दुर्घटना होण्याचा धोका आहे. त्यामुळे तेदेखील काम होणे गरजेचे असल्याचे सरपंच वंदना तांबे, माजी सरपंच मनोज तांबे, ग्रामपंचायत सदस्य बिपीन चौधरी, जयश्री तांबे, सुप्रिया तांबे, गणेश तांबे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे निवेदन

माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागील आठवड्यात पत्र पाठवून आंबेगाव तालुक्यातील विजेसंदर्भातील अडीअडचणी सोडविण्याबाबत महावितरणला सूचना द्याव्यात, असे कळविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Diwali Festival : सांस्कृतिक सपाटीकरणात सापडलेली दिवाळी

Safflower Cultivation : करडईची सुधारित पद्धतीने लागवड

Spice Industry : चटणी, मसाला उद्योगातून समृद्धी

Agriculture Development : कृषी क्षेत्रामध्ये झांबियाची वाढतेय गुंतवणूक

Weekly Weather : ईशान्य मॉन्सून महाराष्ट्राबाहेर मार्गस्थ

SCROLL FOR NEXT