Water Shortage  Agrowon
ताज्या बातम्या

Water Shortage : धुळ्यातील सातपुडा भागात पाणीटंचाई जाणविणार

Water Scarcity : ग्रामीण‎ पाणीपुरवठा विभाग, भूजल‎ सर्वेक्षण व विकास यंत्रणेने संभाव्य‎ टंचाई आराखडा तयार केला आहे.‎

Team Agrowon

Dhule News : जिल्ह्यात मागील तीन वर्षे चांगला पाऊस झाला आहे. पण यंदा कमी पाऊसमान आहे. अशीच स्थिती राहिल्यास पुढे सातपुड्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम‎ क्षेत्रातील ९४ गावे आणि २५‎ पाड्यात टंचाई जाणविण्याची‎ शक्यता आहे. यामुळे सर्वांना जोरदार पावसाची अपेक्षा आहे.

ग्रामीण‎ पाणीपुरवठा विभाग, भूजल‎ सर्वेक्षण व विकास यंत्रणेने संभाव्य‎ टंचाई आराखडा तयार केला आहे.‎ हा आराखडा ऑक्टोबर ते डिसेंबर,‎ जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून‎ तिमाहीनुसार आहे. जिल्ह्यात‎ ऑक्टोबर ते डिसेंबर आणि जानेवारी‎ ते मार्च या दोन तिमाहीत एकाही‎ गावात टंचाई नव्हती. परंतु जूनमध्ये टंचाई काहीशी सुरू झाली.

जुलैतही टंचाई होती.‎ टंचाई दूर करण्याच्या‎ उपाययोजना करण्यासाठी १ कोटी‎ २४ लाखांचा टंचाई आराखडा होता. टंचाईवर मात करण्यासाठी‎ ११९ उपाययोजना केल्या. सध्या टंचाई योजना लागू‎ आहे. जिल्ह्यात सलग तीन वर्षे सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला. २०२०‎ मध्ये १४० टक्के,‎ तर २०२१ मध्ये १२० टक्के पाऊस‎ झाला होता.

जिल्ह्यातील‎ पांझरा, सोनवद, मालनगाव, अमरावती, अनेर आदी मध्यम प्रकल्प, तलाव, लघू प्रकल्पात‎ मुबलक जलसाठा होता. २०१७,‎ २०१८ आणि २०१९ मध्ये जिल्ह्यात‎ टंचाई होती. सध्या विविध प्रकल्पांत मिळून सुमारे ३० टक्के‎ जलसाठा आहे. त्यामुळे सलग‎ तिसऱ्या वर्षी टंचाई कमी होती. परंतु जूनपासून समस्या सुरू झाली. पुढेही कमी पाऊसमान राहिल्यास समस्या वाढणार आहे, अशी माहिती मिळाली.

संभाव्य टंचाईची स्थिती अशी ९४ गावे व २५ वाड्यांमध्ये संभाव्य‎ टंचाईसंबंधीच्या कार्यवाहीत आहेत. त्यासाठी‎ १ कोटी २४ लाख ७० हजारांची‎ तरतूद करावी लागू शकते. हे. ३ विंधन विहिरींसाठी १‎ लाख ८ हजार, दोन तात्पुरत्या पूरक‎ योजनांसाठी २३ लाख, १०३ खासगी‎ विहिरींचे अधिग्रहणासाठी ६१ लाख‎ २५ हजार, ११ टँकरसाठी ३८ लाख‎ ३८ हजारची तरतूद करावी लागेल. अशीच स्थिती राहील्यास पुढे जानेवारी किंवा फेब्रुवारीतच किंवा उन्हाळा सुरू होतानाच टंचाई वाढेल. ५९ गावे आणि २२ वाड्यांमध्ये टंचाईची‎ तयार होईल.

टंचाईग्रस्त गावे..

त्यात धुळे तालुक्यातील १२ गावे, साक्री तालुक्यातील २४ गावे‎ व २३ वाड्या, शिरपूर तालुक्यातील १८ गावे ६ वाड्या व शिंदखेडा‎ तालुक्यातील १८ गावे व १ वाडीचा समावेश आहे. टंचाईवर मात करण्यासाठी‎ धुळे तालुक्यात १२, साक्री तालुक्यात ५१, शिरपूर तालुक्यात २४ आणि‎ शिंदखेडा तालुक्यात २३ योजना आणाल्या लागतील, असेही चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

Vidarbha Rain : पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद

Desi Cow Conservation : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास महत्त्व

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

SCROLL FOR NEXT